Bhandara District APMC Analysis : राष्ट्रवादीने एकटे पाडल्यानंतर नाना जिद्दीने लढले आणि जिंकल्या तीन बाजार समित्या !

Sakoli Bazar Samiti: साकोली-लाखनी बाजार समितीवर परिणय फुकेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेऊन पटोलेंना मात दिली.
Nana Patole and Parinay Fuke
Nana Patole and Parinay FukeSarkarnama

Bhandara District Bazar Samiti Results Analysis: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राज्यातील त्यांचे सहकारी असलेले कॉंग्रेस आणि शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भंडारा जिल्ह्यात एकटे पाडले. पण नानांनीही एकाकी लढत देत चार पैकी तीन बाजार समित्यांवर सत्ता आणली. (Pavani, Lakhandur Bazar Samiti was dominated by Nana Patoles)

चारपैकी नाना पटोलेंचा मतदारसंघ असलेल्या साकोली-लाखनी बाजार समितीमध्ये मात्र त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. येथे माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांचा करिश्‍मा चालला. साकोली-लाखनी बाजार समितीवर परिणय फुकेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेऊन पटोलेंना मात दिली. यातूनही २०२४च्या विधानसभा निवडणुकीचे अंदाज लावले जात आहेत.

एक साकोली-लाखनी सोडली तर पवनी, लाखांदूर बाजार समितीवर नाना पटोलेंनी निर्विवाद वर्चस्व राखले. तर भंडारा बाजार समितीमध्ये नाना पटोले गटाला नऊ आणि त्यांच्या विरोधात लढलेल्या भाजप - शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटाला नऊ, अशा समसमान जागा मिळाल्या. येथे आता सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. फोडाफोडीचे राजकारण सुरू झालेले आहे.

भंडारा जिल्ह्यात नाना पटोले विरुद्ध परिणय फुके अशी लढत बघायला मिळाली. नानासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस नव्हती. उद्धव ठाकरेच्या सेनेचे फारसे अस्तित्व नाही. कारण नरेंद्र भोंडेकर एकनाथ शिंदे यांच्या सेनेत गेल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सैनिकांनी इकडे फार जोर लावला नाही. त्यामुळे भाजप - राष्ट्रवादी विरुद्ध कॉंग्रेस अशा झालेल्या लढतीत नाना पटोलेंनी चार पैकी तीन बाजार समित्या जिंकल्या. (Political Web Stories)

Nana Patole and Parinay Fuke
Washim District APMC Analysis : भाजपने देशमुखांमुळे राखले रिसोड, बाकी सर्वत्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच !

बाजार समिती निवडणुकांचे (APMC Election) निकाल म्हणजे आगामी निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे. नाना पटोलेंच्या साकोली विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते डॉ. परिणय फुके पुन्हा लढणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारीसुद्धा सुरू केली आहे. डॉ. परिणय फुके यांनी साकोली-लाखनी बाजार समिती जिंकून आपले इरादे आजच स्पष्ट केले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

भंडारा (Bhandara) बाजार समितीमध्ये (BJP) भाजप आणि कॉंग्रेस (Congress) या दोन्ही गटांकडे समसमान संचालक आहेत. त्यामुळे सभापती कोण होणार, हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे. मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली असून फोडाफोडीच्या राजकारणालाही ऊत आला आहे.

Nana Patole and Parinay Fuke
Amravati APMC Analysis : सहकार मंत्रालयाचा दबाव टाकूनही भाजपला मिळाली एकच बाजार समिती, जिल्ह्यात कॉंग्रेसच !

जो कुणी संचालक एका बाजूला झुकेल तो पद किंवा पदाचे ‘मूल्य’ याशिवाय तडजोड करणार नाही, असेही सांगितले जात आहे. येथे जर भाजपचा सभापती विराजमान झाला तर जिल्ह्यात चारपैकी दोन बाजार समित्या भाजपकडे तर दोन कॉंग्रेसकडे राहतील. अन्यथा तीन - एक असे चित्र राहणार आहे. (Political Short Videos)

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com