Bhandara : धान खरेदी लावणार भंडारा-गोंदियातील नेत्यांना बट्टा!

Farmer Angry : खरेदीत विलंबाने शेतकऱ्यांमध्ये राजकीय पुढाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी
Paddy Crop in Vidarbha
Paddy Crop in VidarbhaGoogle
Published on
Updated on

Paddy Crop News : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उन्हाळी धानाची खरेदी जिल्ह्यातील नेत्यांच्या प्रतिमेला बट्टा लावणारी ठरणार आहे. दिवाळी पूर्वी जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी धान खरेदी करण्याचे दिलेले आश्वासन फोल ठरल्याने जिल्ह्यातील नेत्यांवर हा प्रसंग ओढवल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळी संपली तरी पाहिजे त्या प्रमाणात धानाची खरेदी सुरू न झाल्याने भाऊ, ‘जी’, शेतकरी नेते यांनी दिलेला शब्द हवेत विरलाय. जिल्ह्यातील शेतकरी नाईलाजानं खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. अत्यंत स्वस्त दरात. त्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी उसनवारीत गेलीय. एकाही राजकीय नेत्यानं यासंदर्भात आवाज न उठवल्यानं दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी सध्या राजकीय पक्षांवर चिडलेले आहेत.

किमान आधारभूत किंमत खरेदी ही केंद्र शासनाची योजना आहे. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने (डिस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये म्हणुन ही योजना राबविण्यात येते. त्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्यामार्फत धान खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने धान खरेदीकरीता राज्यात विकेंद्रीत खरेदी योजना लागू करण्याबाबत केलेली शिफारस विचारात घेत पणन हंगाम २०१६-१७ पासून विकेंद्रित खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. (Bhandara & Gondia District Farmers Got Disappointed Due to Non Purchase of Paddy Crop)

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०२३-२४ या पणन हंगामात हमी भावाने धान खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिलीय. मात्र अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीत आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने धान विक्री करावी लागली. विशेष म्हणजे शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने ९ नोव्हेंबरला परीपत्रक काढण्यात आले. त्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्याचे आदेश देण्यात आलेत. साधारण जातीच्या धानास २ हजार १८३ तर ‘अ’ दर्जाच्या धानास २ हजार २०३ रूपये प्रति क्विंटल भाव निश्चित करण्यात आलाय. तरी तांत्रिक अडचणीत धान खरेदी रखडलीय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हा स्तरावरून सबंधित संस्थांना अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीत अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी केवळ धान नोंदणी सुरू झालीय. काही ठिकाणी प्रत्यक्ष धान खरेदी झाली परंतु ती पाहिजे त्या प्रमाणात नाही. दरवर्षी धान खरेदी वेळापत्रक ठरले असताना विलंब का होतो असा प्रश्न आता उपस्थित होतोय. धान खरेदीच्या मुद्द्यावर या भागातील नेतेही मौन असल्याने शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याप्रती कमालीचा संताप व्यक्त होत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Paddy Crop in Vidarbha
Bhandara Administration : सत्ताधारी आमदाराच्या मतदारसंघात मिळेना अधिकारी, अनेक पदं रिक्त बहुतांश प्रभारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com