Bhandara-Gondia Lok Sabha Election : भाजपचे कुंभलकर बसपाकडून लढणार, सुनील मेंढेंचे टेन्शन वाढले !

Sunil Mendhe : भाजप आणि काँग्रेसच्या दोन कुणबी समाजाच्या उमेदवारांमध्ये कुंभलकर हे तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे ही निवडणूक आम्ही १०० टक्के जिंकू, अशा आविर्भावात असलेले भाजपचे उमेदवार सुनील मुंढे यांची धाकधूक वाढलेली बघायला मिळत आहे.
Sunil Mendhe, Prashant Padole and Sanjay Kumbhalkar
Sunil Mendhe, Prashant Padole and Sanjay KumbhalkarSarkarnama
Published on
Updated on

Bhandara-Gondia Lok Sabha Election : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये अगदी सुरुवातीपासून उमेदवारीसाठी संघर्ष बघायला मिळाला. पक्षांतर्गत विरोधकांवर मात करून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी तिकीट आणलं. काँग्रेसचे नवखे उमेदवार प्रशांत पडोळे यांना मात देऊन पुन्हा खासदार होण्याचे स्वप्न रंगवत असतानाच मेंढेंना स्वपक्षीयाकडूनच जोरदार धक्का बसला. भाजपचे जिल्हा महासचिव आणि माजी नगरसेवक संजय कुंभलकर बसपाच्या तिकिटीवर लढणार आहेत. तेली समाजाची अस्मिता जपण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे कुंभलकर यांचे म्हणणे आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीमध्ये अचानक एक नवीन वळण आले. संजय कुंभलकर हे बसपातर्फे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीला वेगळी रंगत निर्माण झालेली आहे. भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुनील मेंढे याच्या उमेदवारीला भाजपमधून मोठ्या प्रमाणात विरोध होता. संजय कुंभलकर यांच्यामुळे भाजपमध्ये उभी फूट पडली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सुरुवातीपासून सुनील मेंढे यांच्या नावाला विरोध करणाऱ्या भाजपमधील विरोधकांना कुंभलकर यांच्या निमित्ताने एक सुवर्ण संधी चालून आली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या दोन कुणबी समाजाच्या उमेदवारांमध्ये कुंभलकर हे तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे ही निवडणूक आम्ही १०० टक्के जिंकू, अशा आविर्भावात असलेले भाजपचे उमेदवार सुनील मुंढे यांची धाकधूक वाढलेली बघायला मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Mendhe, Prashant Padole and Sanjay Kumbhalkar
Bhandara-Gondia Lok Sabha Constituency : 'अहंकार' उतरविण्यासाठी माजी खासदारांनी 'घड्याळ' ‘बंद’ करून फुंकली 'तुतारी'

भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपतर्फे सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसतर्फे डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक या दोघांमध्येच होईल, अशी समज कालपर्यंत असतानाच अचानक भाजपचे महासचिव संजय कुंभलकर यांनी भाजपला रामराम ठोकत त्यांनी बसपातर्फे उमेदवारी मिळविल्याने या निवडणुकीत आता तिहेरी लढत होणार आहे. कारण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी आणि तेली समाजाची संख्या सर्वाधिक आहे.

भाजप आणि काँग्रेसतर्फे रिंगणात उभे असलेले उमेदवार हे कुणबी समाजाचे आहेत, तर कुंभलकर हे तेली समाजाचे आहेत. 3 मार्चला तेली समाजाचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात एक ठराव घेण्यात आला होता की, जर भाजप आणि काँग्रेसतर्फे तेली समाजाला नेतृत्व मिळाले नाही तर आम्ही तेली समाजाचा उमेदवार उभा करू आणि सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष विसरून तेली समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहू. या ठरावानुसार संजय कुंभलकर यांनी भाजपची साथ सोडून बसपाची उमेदवारी मिळवली असून, आज ते त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

कुंभलकर यांच्या उमेदवारीवर जर ठाम राहिले आणि संपूर्ण तेली समाज एकवटला तसेच भाजपमधून सुनील मुंढे यांना अगदी सुरुवातीपासून बराच विरोध होत होता, ते विरोधकही जर संजय कुंभलकर यांच्या पाठीशी उभे राहिले तर या तिहेरी निवडणुकीत कुंभलकर बाजी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा त्यांनी घेतलेल्या मतांचा फटका सुनील मेंढे यांना बसू शकतो आणि त्याचा फायदा हा काँग्रेसच्या उमेदवारालाही होऊ शकतो. त्यामुळे या तिहेरी लढतीकडे जिल्ह्यांतील मतदारांचे लक्ष लागून आहे.

Edited By : Atul Mehere

R

Sunil Mendhe, Prashant Padole and Sanjay Kumbhalkar
Bhandara-Gondia News : भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील दोन्ही अपक्ष आमदार आमच्यामुळे निवडून आले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com