Bhandara-Gondia Lok Sabha Constituency : 'अहंकार' उतरविण्यासाठी माजी खासदारांनी 'घड्याळ' ‘बंद’ करून फुंकली 'तुतारी'

Madhukar kukude : एरवी अजित पवार गटाच्या कार्यक्रमात दिसणारे मधुकर कुकडे काल अचानक शरदचंद्र पवार गटाच्या बैठकीत दिसल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या.
Madhukar Kukde and Praful Patel
Madhukar Kukde and Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Bhandara-Gondia Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना यंदाचे 2024 वर्ष धक्क्यांचे जाताना दिसत आहे. एकाच वेळी 200 कार्यकर्त्यांनी घड्याळ उतरवून पंजाशी 'हात' मिळवणी केल्याचे उदाहरण ताजे असताना आता चक्क एका मोठ्या नेत्याने चक्क ‘घड्याळ’ ‘बंद’ करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात सामील होत प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात 'तुतारी' फुंकली आहे.

पक्ष सोडताना कुणाचे नाव न घेता आपल्याला कुणाचा तरी 'अहंकार' उतरवायचा असल्याची भाषा करून माजी खासदार मधुकर कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात सामील झाले आहेत. माजी खासदार मधुकर कुकडे यांचा निशाणा कुणाकडे होता, हा प्रश्‍न भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत चवीने चर्चिला जात आहे. काल बुधवारी (ता. 21) भंडारा शहरात देवेंद्र लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची जिल्हास्तरीय बैठक होती. शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांच्या नेतृत्वात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला माजी खासदार मधुकर कुकडेसुद्धा उपस्थित होते. एरवी अजित पवार गटाच्या कार्यक्रमात दिसणारे मधुकर कुकडे काल अचानक शरदचंद्र पवार गटाच्या बैठकीत दिसल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या. कुकडेंनी तुतारी हातात पकडल्याची सुरूच झाली, तेवढ्यात जाहीर भाषणात आपल्याला कोणाचा 'अहंकार' उतरवायचा आहे, असे वक्तव्य मधुकर कुकडे यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Madhukar Kukde and Praful Patel
Bhandara-Gondia Constituency : उमेदवारीसाठी पोवार समाजाची दावेदारी, सर्व पक्षांना निर्वाणीचा इशारा !

आपण जिल्ह्यासाठी काय काय केलं, याचा ऊहापोह करत असताना खरंच ती कामे झालीत का, याच्या पोचपावतीचा हिशोबच माजी खासदार मधुकर कुकडे यांनी घेतला आहे. 'भेल'च्या प्रकल्पाची झालेली 'भेलपुरी’ ही माजी खासदार मधुकर कुकडेंनी उकरून काढली आहे. या दरम्यान संपूर्ण भाषणात मधुकर कुकडे यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी मधुकर कुकडेचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या एका मोठ्या नेत्यावर होता, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

अचानक का संतापले संयमी कुकडे ?

एरवी आपल्या संयमी व्यवहाराने परिचित असलेले माजी खासदार मधुकर कुकडे अचानक टोकाची भाषा बोलायला लागल्याने त्यांच्या मनात जुन्या पक्षांतर्गत काही 'शल्य' बोचत असल्याचे शरदचंद्र पवार गटाचे नेते सांगायला लागले आहेत. अजित पवार गटामध्ये माजी खासदार मधुकर कुकडे यांची घुसमट होत असल्याचे एका नेत्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळेच मधुकर कुकडे शरदचंद्र पवार गटात आल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी संयमी कुकडे यांच्या तोंडातून अहंकार उतरवण्याची भाषा आली असल्याने कुकडेंच्या संतापाचे कारण काय, याचा शोध राजकीय जाणकार घेत आहेत.

Edited By : Atul Mehere

R

Madhukar Kukde and Praful Patel
Bhandara-Gondia Lok Sabha Constituency : लोकसंग्रहाच्या बळावर डॉ. परिणय फुके यांची मैदानात उतरण्याची तयारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com