Bhandara News : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शासन आलं दारी, विरोधकांना घडली पोलिस ठाण्याची वारी

Preventive Measures : पोलिसांनी दिवसभर केले अनेकांना स्थानबद्ध
Leader's in Bhandara
Leader's in BhandaraSarkarnama
Published on
Updated on

CM, DCM Visit : भंडारा येथे सोमवारी (ता. २०) शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. राज्याचे प्रमुख नेते जिल्ह्यात आल्यानं भंडारा पोलिसांनी सोमवारी सकाळपासूनच विशेष खबरदारीचे उपाय केले.

राज्यभरात सध्या अनेक मुद्द्यांवर आंदोलन सुरू आहे. विरोधी पक्षातील नेतेही काही आंदोलनांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा लक्षात घेता पोलिसांनी जिल्हाभरात काही प्रतिबंधात्मक उपाय केले. त्यातून काही नेत्यांना स्थानबद्धही करण्यात आलं. (Bhandara Police Detained Many Leaders Due To Visit Of Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Ajit Pawar)

पोलिसांनी स्थानबद्ध केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना समावेश होता. याशिवाय मराठा, ओबीसी, धनगर समाजातील नेत्यांवरही पोलिस लक्ष ठेऊन होते. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचंही आंदोलन सुरू आहे. त्यादृष्टीनंही पोलिसांनी नजर ठेवली होती. परंतु यापैकी फक्त काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत कार्यक्रम संपेपर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं होतं.

नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आल्यानं भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. हा प्रकार म्हणजे अघोषित आणीबाणीसारखा असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घरात येत पोलिसांनी उचलून नेलं. त्यातून सरकारला काय साध्य करायचं आहे, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. सरकार लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या दारी येत आहे. त्यांचे प्रश्न सोडवत आहे आणि दुसरीकडे सरकारला कोणी प्रश्नच विचारायला नको म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात येत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये ‘रोड शो’बाबत कोणताही उल्लेख नव्हता. ऐनवेळी यासंदर्भात माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. त्यामुळं अखेरच्या क्षणी पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानं मुख्यमंत्री जाणार असलेल्या मार्गावर बंदोबस्त तैनात करताना भंडारा पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा असल्यानं पोलिसांना ‘रोड शो’च्या मार्गावर त्यादृष्टीनं मनुष्यबळ तैनात करताना तारेवरची कसरत करावी लागली. ज्या मार्गांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘रोड शो’ करणार असल्याचं सांगितलं, त्या मार्गावर काही ठिकाणी फेरीवाले होते. काही प्रमाणात अतिक्रमणही होतं. वाहतूक व्यवस्थेचेही काही मुद्दे होते. ऐनवेळी कार्यक्रमात बदल झाल्यानं पोलिसांनी अतिरिक्त ताफा लावत हा मार्ग ‘क्लीअर’ करावा लागला.

Edited by : Prasannaa Jakate

Leader's in Bhandara
Gondia News : केवळ एक ग्लास लिंबू सरबतानं भाजपनं लावला काँग्रेस संघटक गळाला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com