Gondia News : केवळ एक ग्लास लिंबू सरबतानं भाजपनं लावला काँग्रेस संघटक गळाला

Sanjay Puram : नक्षलग्रस्त पिपरीयाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी घेणार पुढाकार
Hunger Strike in Gondia
Hunger Strike in GondiaSarkarnama
Published on
Updated on

Congress Vs BJP : निवडणुकीचा काळ जसजसा जवळ येत आहे, तसतसे विविध राजकीय पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांच्या पळवापळवीला जोर आलाय. गोंदिया जिल्ह्यातही हा प्रकार सुरू झालाय. एका पक्षात नाराज असलेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाकडून दारं खुली केली जात आहेत. त्यातून काँग्रेस संघटक उपसरपंच भाजपच्या गळाला लागलाय.

नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यात आणि पिपरीया गावात संघटन अधिक मजबूत करण्यात भाजपला त्यामुळं यश आलंय. पिपरीया गावात अनेक समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण होत नसल्यानं उपसरपंच तथा काँग्रेसचे संघटक गुनाराम मेहर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. बुधवारी (ता. १५) बिरसा मुंडा जयंतीपासून मेहर यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, काँग्रेसमधील कुणीच त्यांच्या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे मेहर नाराज होते. (BJP Leader & Former MLA Sanjay Puram Succeeded In Dividing Congress at Salekasa of Gondia District)

उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर देवरीचे भाजप नेते तथा माजी आमदार संजय पुराम यांनी उपोषणस्थळ गाठलं. मेहर यांच्याकडून सालेकसा आणि पिपरीया गावातील सद्य:स्थितीची माहिती घेतली. सालेकसा तालुक्यातील हा भाग अतिदुर्गम आहे. आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त असलेल्या या क्षेत्रात मूलभूत सुविधाही नाहीत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाल्यानंतरही एखाद्या गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ नये, याबद्दल मेहर यांनी संताप व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु अद्यापही पिपरीयाकडं लक्ष देण्यात येत नसल्याबद्दल मेहर यांनी लक्ष वेधलं. विशेष म्हणजे त्यांचा सर्व रोख काँग्रेसचे विद्यमान आमदार सेशराम कोरेटी यांच्यावर होता. त्यामुळं गावात पक्के रस्ते, तालुका व जिल्हा मुख्यालयापर्यंत दर्जेदार मार्ग, प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी प्रयत्न करू, असा शब्द माजी आमदार पुराम यांनी मेहर यांना दिला. त्यासाठी समस्या शासन दरबारी पाठपुरावा करण्याची तयारीही त्यांनी दाखविली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुराम यांनी केलेल्या चर्चेनंतर मेहर उपोषण स्थगित करण्यास तयार झालेत. मेहर यांनी पुराम यांच्या हस्ते लिंबू सरबत घेत उपोषण मागं घेतलं. मेहर यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर गोंदियातील काँग्रेस वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचं उपोषण भाजपच्या आमदारानं सोडविल्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झालेत. त्यातून काँग्रेसचे नेते बिनकामाचे असल्याचा प्रचार सुरू झाला. तूर्तास मेहर यांनी लिंबू सरबतावर भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सर्वत्र आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Hunger Strike in Gondia
Gondia Administration : नियोजन ढासळले, शिधा न मिळाल्यानं २३ गावांतील आनंदावर विरजण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com