Bhandara Political Climate News : पावसांच्या सरींनी वातावरणात गारवा, पण नेत्यांच्या यात्रांनी तापू लागले राजकीय वातावरण !

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांचा दौरा आखण्यात आला आहे.
Bhandara
BhandaraSarkarnama
Published on
Updated on

Bhandara District Political News : ऑगस्ट महिन्यात सुट्टीवर गेलेला पाऊस सप्टेंबर महिन्यात परतला. भंडारा जिल्ह्यात सर्वत्र सतत पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या वातावरणात गारवा आहे. पण जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. (NCP youth leader Rohit Pawar's visit has been planned)

भविष्यात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता. सर्व राजकीय पक्षांचे नेते आपला पक्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहाेचवण्यासाठी जिल्ह्यात जनसंवाद यात्रा, लोकमिलन, घर चलो अभियान यांसारखे कार्यक्रम घेताना दिसत आहेत. ही सर्वत्र राजकीय पुढाऱ्यांची धावपळ बघता जिल्ह्यावासीयांना पावसाच्या गारव्यात तापलेले राजकीय वातावरणही पाहायला मिळत आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात भाजपतर्फे (BJP) नुकतीच जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. दुसरीकडे कॉंग्रेसने (Congress) जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांच्या घरांपर्यंत जाणे सुरू केले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शरद पवार गटही सरसावला आहे. येत्या १३ सप्टेंबरला राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांचा दौरा आखण्यात आला आहे.

दौऱ्यादरम्यान रोहित पवारांची जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे. या सर्व घडामोडींमुळे एरवी जिल्ह्यात शोधूनही न सापडणारे नेते आता गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत. एवढेच काय, तर शेतांच्या बांधांवर जाण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा लागलेली बघायला मिळत आहे.

Bhandara
RSS vs BJP News : संघ प्रचारकांचा अपमान करणारा ‘तो’ नेता कोण? भाजपला भोवणार संघाची नाराजी?

जिल्ह्यात निवडणुकीचे वेळापत्रक आले आहे. लवकरच निवडणूक लागणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आत्तापासून तयारीला लागा व लोकांपर्यंत पोहोचा, असा फतवा सर्व पक्षश्रेष्ठींकडून काढण्यात आल्याचे समजते. यात ग्रामीण भागातील नेत्यांचे कसब पणाला लागले आहे. सर्व नेते जिल्ह्याच्या तालुक्यांत सहज नजरेस पडतात.

त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेसच्या यात्रांमध्ये गर्दी झालेली दिसते. यात्रेदरम्यान सत्तापदाकडून आपला पक्ष कसा श्रेष्ठ आणि आपण किती व कसा विकास केला हे लोकांना पटवून सांगितले जात आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची लक्तरे काढत फिरत आहे. या स्पर्धेत आता राष्ट्रवादीचा शरद पवार गटही लवकरच सहभागी होणार आहे. १३ सप्टेंबरला रोहित पवार यांचा दौरा असून, त्यांची जाहीर सभासुद्धा आयोजित करण्यात आली आहे.

एकंदरीतच या महिन्यात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. या सर्व यात्रांमुळे जिल्हावासीयांचे चांगले मनोरंजन होत आहे. पण लोकांमधून ‘यह पब्लिक है सब जानती है’, असा सूर ऐकायला मिळत आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com