Bhandara Unseasonal Rain : ‘तेव्हा’ फोटोसेशन करून गेलेले नेते आज कुठे गेले ?

Political Leaders : तुम्हाला वर्षभरही तेवढेच धंदे आहेत, या वेळात तरी आमच्याकडे लक्ष द्याल का?
Bhandra District Crop
Bhandra District CropSarkarnama
Published on
Updated on

Bhandara Unseasonal Rain : भंडारा जिल्ह्यातील भंडारा, साकोली, लाखनी तालुक्यातील काही गावांत शनिवारपासून ते सोमवारी सकाळी गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित तालुक्यांतही अवकाळी पाऊस झाला. प्रामुख्याने गारपीट झालेल्या गावांतील रब्बी पिकांना मोठा तडाखा बसला आहे. पण सत्ताधारी आणि विरोधक राजकारणात गुंतलेले आहेत. आता तरी आमच्याकडे लक्ष द्याल का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

गहू, हरभरा, भाज्यासह, फळबागा व रब्बी पिकांचे अवकाळी पाऊस व गारपीटमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान राज्यात सद्यस्थितीत घडत असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमुळे सरकारचे अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान पहेला मंडळात भंडारा तालुक्यात एकूण 29.4 मिमी पाऊस पडला.

पहेला मंडळामध्ये अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. मोठ्या आकाराच्या टपोऱ्या गारांचा वर्षाव झाला. गारपिटीच्या तडाख्याने या भागात शेतकऱ्यांनी लावलेली रब्बी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. गव्हाचे पीक भुईसपाट झाले तर टोमॅटो, मिरची, वांगी, शेंगावर्गीय पिकांची झाडे गारपिटीच्या माऱ्याने अस्तव्यस्त झाली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhandra District Crop
Bhandara Politics : राजीनामा सत्रानंतर पटोलेंच्या गृहजिल्ह्यात सारेच `कीप क्वाईट’ !

एकट्या पहेला मंडळात 17 मिमी पाऊस झाला असून उर्वरित भागात सरासरी 3 मिमीच्या आत पावसाची नोंद घेण्यात आली. या भागात कुठे बोराच्या तर काही भागात लिंबाच्या आकाराएवढ्या गारा पडला. गारपिटीच्या माऱ्याने पिके मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाली. कौलारू घरांचे आणि उघड्यावर असलेल्या वाहनांवर गारा आदळल्याने नुकसान झाले आहे.

नुकसानाचे सर्व्हेक्षण..

शनिवारी रात्रीपासून झालेल्या गारपिटीने सोमवारी पहाटेसुद्धा भंडाराकरांचा पिछा सोडला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण आपल्या पातळीवर सुरू केले आहे. तहसीलदार, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी सुरू केली आहे. गारपीटग्रस्त भागातील शेतात जाऊन नुकसानाच्या नोंदी घेण्याचे काम महसूल व कृषी विभागाने हाती घेतले आहे.

आपल्याला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे नेते मात्र बांधावर अद्यापही भटकले नाही. यंदा घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत फोटो काढण्यासाठीही वेळ नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आधीच्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नसताना फोटोसेशन करून गेलेल्या नेत्यांची जिल्ह्यातील शेतकरी आपल्या बांधांवर वाट पाहत आहेत.

Edited By : Atul Mehere

Bhandra District Crop
Bhandara Corruption News : भंडाऱ्यातील बंद पडलेल्या कंपनीतील कोट्यवधींचा भ्रष्टाचार पोहोचला मंत्रालयात !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com