भंडारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दिनांक ८ जानेवारी) पार पडली. यात इतर विषयांबरोबर विरोधी बाकावर बसलेल्या भाजप, राष्ट्रवादीच्या सदस्यांना निधी कमी का ? हा मुद्दा प्रकर्षाने गाजला आहे. सभेत विरोधी बाकावरील भाजप व राष्ट्रवादीच्या सदस्यांना जाणीवपूर्वक विकासकामांसाठी अल्प निधी दिली जातो. तर सत्ताधारी काँग्रेसच्या सदस्यांना अधिक निधी का मिळतो? असा प्रश्न विरोधी पक्षनेते विनोद बांते यांनी उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांची बोबडी वळली.
भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असून भाजप व राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहेत. परिणामी विरोधी गटाला जाणीवपूर्वक विकास निधीपासून वंचित ठेवले जात असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला. याशिवाय अन्य प्रश्न उपस्थित करून सभा विविध विषयांवर गाजविण्यात आली. विरोधी गटातील सदस्यांनी विविध प्रश्नांवर सत्ताधारींना जाब विचारला. जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्दयांवर समर्थनही घोषित केले. ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यास सहभाग दिला आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा काल सोमवारी अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांच्या नेतृत्वात सुरू झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उमेश नंदागवळी, उपाध्यक्ष संदीप ताले, सभापती मदन रामटेके, रमेश पारधी, स्वाती वाघाये, राजेश सेलोकर, भाजपचे गटनेते विनोद बांते व सर्व विभाग प्रमुखांसह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यावेळी पहिल्यांदा ही सभा लाइव करण्यात आली होती.
भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. राज्यात भाजप ‘पावर’ मध्ये आहे. भंडाऱ्यात मात्र भाजपचा एक गट काँग्रेससोबत सत्तेत आहे.अशा पक्षाचा खिचडीने जिल्हा परिषदेची सरकार आपले काम करीत आहे.यात निधि वाटपला घेऊन नेहमी वाद होताना आपल्याला पहायला मिळत आहे. यावेळी जिल्हा परिषदेची ही सभा लाइव पहायला मिळाली आहे. अनेक जिल्हा परिषद सदस्य आपल्या बोलू दिले जात नसल्याची तक्रार करीत असतांना दिसले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या सर्व घडामोडित जिल्हा परिषदेच्या यापूर्वीच्या अनेक सभेत गाजलेला गणेशपूर ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा चर्चेत आला. या मुद्यावर एफआयआर दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी एक दिवसापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस तपास करून आरोपींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. या बरोबर सभेत अनेक गंभीर विषयांवर चर्चा झाली. ओबीसी मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीसाठी जिप जकातदार कन्या शाळेच्या जुन्या इमारतीचा जागा ठराव घेऊन मंजूर करण्यात आली. या सभेनंतर कही खुशी कही गम से वातावरण जिल्हा परिषद सदस्यात पहायला मिळाले आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.