Funds Issue : सरकार विषकन्येसारखे आहे, जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो, ‘हायवेमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या या वाक्याची प्रचीती भंडारा जिल्ह्यात येत आहे. लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे ग्रामपंचायतींच्या निधीची गंगा थांबली आहे.
निधीअभावी गावांचा विकास खुंटला आहे. सामान्य फंडातून किरकोळ खर्च करीत भागविले जात आहेत. ग्रामपंचायतीला आर्थिक दृष्टीने सक्षम करणाऱ्या योजना गुंडाळण्यात आल्याने विकासाची मदार आता फक्त पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर आली आहे.
निधीच नसल्याने गावांमधील विकासकामे प्रभावित झाली आहेत. जुन्या योजना पुनरुज्जीवित करण्याची मागणी आता होत आहे. गावांच्या विकास आणि कल्याणासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शासनस्तरावरून या योजनेत कोट्यवधींचा निधी उपलब्ध करण्यात येत आहे. यशवंत ग्रामसमृद्धी योजनेचाही समावेश यात होता. या योजनेमुळे गावांचा चेहरामोहरा बदलवला. गावांमध्ये सिमेंट रस्ता बांधकामाचे जाळे विणले गेले. शासनस्तरावरून थेट निधी ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे.
परंतु या योजनेत लोकप्रतिनिधींनी नाक खुपसल्याने ती गुंडाळण्यात आली आहे. ग्रामविकासाच्या अशा योजनांमुळे लोकप्रतिनिधींच्या दारावर ग्रामीण भागातून कुणी निधीसाठी जात नव्हते. लाखो रुपयांची कामे या योजनेतून झाली. परंतु आता ही योजना गुंडाळण्यात आल्याने निधीची समस्या निर्माण झाली आहे. गावांच्या विकासकामांसाठी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात आली होती. या योजनेमुळे गावात हिरवळ तयार झाली. स्वतंत्र निधी उपलब्ध होत असल्याने गावात विकासकामांना मोठी चालना मिळाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ग्रामपातळीवरील ही योजनाही गुंडाळण्यात आली आहे. त्यामुळे निधीची कमतरता ग्रामपंचायतींना भासत आहे. महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार देणाऱ्या योजनाही आहेत. परंतु आता पुरस्कारांच्या या योजना व उपक्रम कालबाह्य होताना दिसत आहेत. नवीन योजना गावात आलेल्या नाहीत.
‘सरकारनामा’शी याबाबत बोलताना बेला ग्रामपंचायत सदस्या स्नेहल मेश्राम म्हणाले की, दीड हजार लोकवस्तीच्या गावात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून वित्तपुरवठा होत आहे. परंतु प्राप्त होणारा निधी अल्प आहे. सामान्य फंडात ठणठणाट आहे. सदस्यांना चहापान नाही, त्यामुळे मासिक सभांना त्रास होतो. गावात फक्त्त सिमेंट दोन रस्ते, काँक्रिट नाली आणि सभामंडप बांधकाम करण्यासाठी लोकप्रतिनिधी निधी उपलब्ध करीत आहेत. पर्यावरण, पाणी, शाळांची कामे, मैदान, सौंदर्यीकरण करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निधीची समस्या सोडविणे नितांत गरजेचे झाले आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.