Bharat Jodo Yatra : राहुल गांधींना आवरला नाही भजी तळण्याचा मोह ; सोलापुरी जेवणाचा घेतला आस्वाद!

Bharat Jodo Yatra : सोलापुरी पदार्थ चविष्ट होते असे राहुल गांधींनी कौतुक केले.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo YatraSarkarnama
Published on
Updated on

अकोला : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली "भारत जोड़ो" यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. अकोला जिल्हा भारत जोड़ो पदयात्रेची जबाबदारी प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे सोपविली होती. राहुल गांधी आणि काँग्रेस नेतेमंडळी यांच्या दुपारच्या जेवणाच्या मेजवानीचा बेत प्रणिती शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर ते बाळापुर मार्गावरील गजानन रोपवाटिका येथे आयोजीत केला होता.

Bharat Jodo Yatra
अजितदादा भाजपमध्ये जातील का? मिटकरी म्हणतात...

सोलापुरचे असे काही खाद्यपदार्थ आहेत की, जे पाहताच कोणताही खवय्य्या स्वत:ला खाण्यापासून थांबवू शकणार नाही, असे विविध पदार्थ या जेवणाच्या मेजवानीत केले होते. त्यामध्ये मिर्ची चिरुन चिंच आणि इतर पदार्थ भरून केलेली खमंग गरमागरम आंध्र भजी, खुशखुशीत-चटपटीत धपाटे, दही सोबत झणझणीत शेंगा चटणी, सोलापुरची ख़ासियत असलेली ज्वारीची आणि बाजरीची कड़क भाकरी, पौष्टिक गव्हाची हुग्गी यासारखे स्वादिष्ट पदार्थ मेजवानीत होते. राहुल गांधी आणि उपस्थित नेतेमंडळीनी मनसोक्त सोलापूरी जेवणाचा आस्वाद घेतला. अतिशय चविष्ट पदार्थ होते असे राहुल गांधींनी कौतुक केले.

Bharat Jodo Yatra
न्यायालयाने वाढवले राजकीय पक्षांचे टेन्शन; निवडणूक हरल्यास चिन्ह गमावू शकतात!

यावेळी राहुल गांधी यांनी सर्व पदार्थांची माहिती संबंधीत सोलापुरच्या स्वंयपाक केलेल्या महिला भगिनी कडून घेतली. तसेच भजी बनवत असताना बघून राहुलजीना भजी तळण्याचा मोह आवरता आहला नाही. स्वत: त्यांनी काही भजी तळले. त्यामुळे उपस्थितांना आश्चर्यचकीत झाले.

यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोड़ो यात्रेमध्ये निष्ठेने काम केलेल्या प्रणिती शिंदे आणि सर्वांचे कौतुक केले. सोलापुरी खाद्यपदार्थ बनविण्याकरीता यल्लाप्पा तुपदोळकर, शांतकुमार बळगेरी, महानंदा रामपुरे, लक्ष्मी यादगिरी, पद्मिनी शेट्टीयार, समाधान हाके यांनी विशेष परिश्रम घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com