Bharat Jodo Yatra : 'कदम कदम बढाये जा..' भारत जोडोत केरळच्या बँड पथकाने आणली रंगत!

Bharat Jodo Yatra : काश्मीर पर्यंत हे पथक राहुल गांधी यांच्या सोबत चालणार आहे.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo YatraSarkarnama

अकोला : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या सर्वात पुढं असलेले बँड पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वर्गद्वारा असं या बँड पथकाचं नाव आहे. कन्याकुमारी पासून हे बँड पथक या यात्रेत सहभागी असून अजूनही यात्रेत मार्गक्रमण करत आहे. हा बँड पथक यात्रेत केवळ सहभागी होत नाही तर तालात सुरात बँड वाजवत सर्वात पुढं चालत असतात. काश्मीर पर्यंत हे पथक राहुल गांधी यांच्या सोबत चालणार आहे.

राहुल गांधी यांच्या यात्रेत कन्याकुमारी पासून असलेल्या स्वर्गद्वारा बँड पथक गेल्या काही वर्षांपासून बँड पथक व्यवसायात कार्यरत आहेत. केरळच्या कुन्नूर जिल्ह्यात हे बँड पथक कार्यरत आहेत. यावेळी बँड पथकातील सहभागींनी आपली भावना बोलून दाखवली. देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि अशांतता यातून राहुल गांधी मार्ग काढतील आणि भारत जोडो यात्रा हे त्याकडे जाण्याचा एक मार्ग आहे, त्यामुळेच आम्ही या यात्रेशी जुळलो आहोत, असे पथकातील सैफुउद्दीन सांगतात.

Bharat Jodo Yatra
Jharkhand News : मुख्यमंत्री सोरेन यांची आज ईडी चौकशी : राजधानी रांचीतलं राजकारण तापलं!

मानधनाचा पैसाही सेवेसाठी :

स्वर्गद्वारा बँड पथक आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या मानधानातील काही भाग हा समाजसेवेसाठी, सामाजिक कार्यासाठी वापरतात. मात्र भारत जोडोमध्ये कुठलेही मानधन हे पथक घेत नाहीये, असेही बँड पथकातील लोकांनी सांगितले.

Bharat Jodo Yatra
Narayan Rane : राणे नमले ; बंगल्यातील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात

दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातील तिसरा दिवस, तर महाराष्ट्रातील यात्रेचा 11 वा दिवस आहे. आज ही यात्रा अकोला जिल्ह्यात असून सकाळी सहा वाजता पातूर येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. बाळापूर तालुक्यातील बाग फाटा इथे आज यात्रेचा मुक्काम असणार आहे. भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात आणि आनंदात स्वागत केले जात आहे. आज एक वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com