Bhandara : तेलंगणातील ‘केसीआर’च्या ‘बीआरएस’ची महाराष्ट्रात भ्रूणहत्या

BSR : काँग्रेसनं केलं टायर पंक्चर, हवा मात्र गेली विदर्भातील नेत्यांची; आता धरणार कुणाचे ‘चरण’
Charan Waghmare & K. Chandrashekar Rao.
Charan Waghmare & K. Chandrashekar Rao.Google
Published on
Updated on

Telangana Assembly Results 2023 : तेलंगणातील विधानसभा निवडणूक निकाल रविवारी (ता. 3) जसजसे जाहीर होऊ लागले तसतसे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे चेहरे फुलले अन‌् विदर्भातील भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्यांनी घरातच राहणे पसंत केले.

तेलंगणातील दारुण पराभवामुळं महाराष्ट्रात नव्यानं जन्म घेऊ पाहात असलेल्या बीआरएसची भ्रूणहत्याच झाली. अशात प्रस्थापित पक्षांना सोडचिठ्ठी देत के. चंद्रशेखर राव यांच्या ‘मोटारीत’ बसलेल्या विदर्भातील नेत्यांना प्रवासाच्या सुरुवातीलाच गाडीचं टायर पंक्चर झाल्यानं आता कुणाचे ‘चरण’ धरावे असा प्रश्न पडला आहे. (Bharat Rashtra Samithi Leaders From Bhandara Of Vidarbha Got Upset After Results Of Telangana Assembly Election 2023)

Charan Waghmare & K. Chandrashekar Rao.
Bhandara News : शासन दारी आले; हर घर नल, हर घर जल योजना देऊन गेले

बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी ज्या प्रमुख मुद्द्याला समोर करून महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार सुरू केला होता, त्याच ‘विकास मॉडल’ला तेलंगणातील मतदारांनी नाकारलंय. तेलंगणात बीआरएसची मोटार पंक्चर झाली असली तरी हवा मात्र विदर्भातील विशेषत: भंडाऱ्यातील नेत्यांची निघाली. तेलंगणात बीआरएसच्या दारुण पराभवाचा जबर फटका पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनाही बसण्याची शक्यता आहे.

अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बीआरएसनं यश मिळवलं, परंतु तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भातील मतदार बीआरएसला कितपत पसंती देतील, याबद्दल आता साशंकता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील पक्षविस्तारावर त्याचा परिणाम नक्कीच दिसणार आहे. बीआरएस तेलंगणासह महाराष्ट्रात मुसंडी मारणार, यावर ठाम विश्वास ठेवत विदर्भातील काही नेत्यांनी प्रस्थापित पक्षांना राम राम ठोकला होता. मात्र, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील जबर फटक्यामुळं त्यांची ‘गुलाबी’ स्वप्नं कशी साकार होणार, असा प्रश्न आता त्यांनाच पडल्याशिवाय राहिला नसेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भंडारा जिल्ह्यात माजी आमदार चरण वाघमारे हे बीआरएसचं नेतृत्व करतात. तेलंगणातील बीआरएसच्या वाटचालीवर त्यांचंही राजकीय भवितव्य अवलंबून असल्याचं बोललं जात आहे. अशात बीआरएसला मतदारांनी नाकारल्यानं आता त्यांनाही भंडाऱ्यासाठी नवीन मुद्दे शोधावे लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रविवारी होती. त्यामुळं वाघमारे आता काय करतात याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळाला आहे. तेलंगणात के. चंद्रशेखर राव विजयाची हॅट्‌ट्रिक करणार असा पक्षाच्या नेत्यांना विश्वास होता. परंतु रविवारी या सर्वांची स्वप्न पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

Edited by : Prasannaa Jakate

Charan Waghmare & K. Chandrashekar Rao.
Bhandara : मध्य प्रदेशात कोण जिंकणार? चक्क स्टॅम्प पेपरवर लागली पैज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com