Water For Everyone : भंडारा जिल्ह्यात जलजीवन योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू झालय. या मिशनअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीनं सुमारे 692 पाणीपुरवठा योजनांना मान्यता मिळालीय. मंजूर कामांपैकी सुमारे 248 गावांतील भौतिक सुविधांची कामे दिवाळीपूर्वी पूर्ण झाली. त्यामुळं हर घर नल, हर घर जल पोहोचविण्यात भंडारा जिल्हा परिषद प्रशासन यशस्वी ठरलं आहे.
सध्या 444 कामं प्रगतिपथावर आहेत. 2024 पर्यंत उर्वरित कामं पूर्ण करण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग प्रयत्न करीत आहेत. (Har Ghar Nal Har Ghar Nal Project Succeeded In Bhandara District By Administration)
केंद्र शासनानं २०१९ मध्ये जलजीवन मिशनची घोषणा केली. हर घर नल, हर घर जल संकल्पनेसह देशातील शुद्ध पिण्याच्या पाण्याची दुर्लभता संपुष्टात आणण्याचा यातून प्रयत्न करण्यात हाेतोय. 2024 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे व सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेतून प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली.
भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेनं जलजीवन मिशन हाती घेतले आहे. त्यातून 692 योजनांना मंजुरी देत कार्यारंभ करण्यात आलाय. मंजूर योजनांच्या कामांमध्ये पाणीपुरवठा योजना, टाकी, जलवाहिन्या, विहीर, नळ कनेक्शन जोडणी व अन्य कामांचा समावेश आहे. जुन्या जलवाहिन्या व योजनांचे नूतनीकरण यांचाही समाविष्ट आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 248 गावांतील पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यातून शुद्ध पिण्याचे पाणी घरोघरी पोहोचविण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. देशमुख यांनी ‘सरकारनामा’ला दिलेल्या माहितीनुसार जलजीवन मिशनअंतर्गत मार्च 2024 पर्यंत 2 लाख 56 हजार 308 घरांत नळाचे कनेक्शन लावले जाईल. आतापर्यंत 75 टक्के कामं पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत मंजूर 692 कामांपैकी 444 कामं प्रगतिपथावर आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जल मिशनच्या कामाची स्तुती केली.
भंडारा जिल्ह्यात 2 लाख 56 हजार 309 घरकुल आहेत. त्यातील 82 हजार 426 घरांमध्ये ऑगस्ट 2019 पर्यंत नळ जोडणी होती. सद्य:स्थितीत 1 लाख 94 हजार 170 घरांमध्ये नळ जोडणी देण्यात आली आहे. 1 लाख 11 हजार 744 घरांना जल जीवन मिशन सुरू झाल्यानंतर नळ जोडणी देण्यात आली. 765 गावांपैकी 318 गावांमध्ये शंभर टक्के नळ जोडणी झाली. 27 गावांमध्ये अद्याप काम सुरू होणे बाकी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.