Bhavana Gawali : शिवसेनेत भावना गवळींची फरफट होणार का ?

Yavatmal–Washim LokSabha Election 2024 : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापल्यास त्यांची फरफट होणार काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण,अनेक लोकसभा निवडणुकीत विरोधकांना धक्का देण्याचे तंत्र भावना गवळी यांनी आत्मसात केले आहे. या वेळी त्या कुठले धक्कातंत्र वापरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bhavana Gawali.
Bhavana Gawali.Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या जागेवर शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्याबरोबर भाजपचे मनीष पाटील आणि राजू पाटील राजे यांच्यासाठी उमेदवारी मागितली जात आहे. गेल्या अनेकवेळा लोकसभा निवडणुकीत राजकीय विरोधकांनी कितीही रान पेटवले तरी मात्र भावना गवळी यांचा विजय मातृशक्तीच्या आशीर्वादाने कायम राहिला आहे. अशा वेळी भावना गवळी या विद्यमान खासदाराचे तिकीट कापण्याची तयारी का करण्यात येत आहे, हा प्रश्न यवतमाळ आणि वाशीममध्ये निर्माण होताना दिसतो.

या लोकसभा मतदारसंघातील महिलांची शक्ती भावना गवळी यांच्या कार्यामागे आहे. अशा परिस्थितीत महिला शक्तीकडे दुर्लक्ष करत शिवसेनेने यवतमाळ-वाशीम मतदारसंघात उमेदवार बदलण्याचा निर्णय हा निश्चित महायुतीच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा ठरणार आहे. त्याच बरोबर यवतमाळ - वाशीम या लोकसभा मतदारसंघात भाजपची मागणी हीदेखील व्यवहार्य नसताना विद्यमान खासदार भावना गवळी यांना डावलण्याचे षडयंत्र कोणाचे असा प्रश्न उपस्थित होतो. वाशीम लोकसभा मतदारसंघाचे दोनदा (1999,2004) प्रतिनिधित्व आणि यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा (2009,2014 आणि 2019) प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना मोदी आणि शिंदे यांच्या आशीर्वादाने तिकीट मिळते काय हे पाहण्यासारखे ठरेल.

Bhavana Gawali.
Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाने छेडले व्हॉट्सॲप वॉर, पण नागपुरातून येणारा निरोपच महत्त्वाचा !

लोकसभेत विविध प्रश्नांवर आक्रमक नेत्या म्हणून भावना गवळी यांचा परिचय आहे. असे असताना विद्यमान खासदारांचे तिकीट रद्द करण्याची हिंमत का करण्यात येत आहे. या मतदारसंघावर संजय राठोड यांनी दावा केला नसताना व त्यांनी त्याविषयी स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांच्या गळ्यात माळ टाकण्यामागे कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उमेदवार देशमुख यांना दान देण्याची तयारी तर भाजप व शिवसेना शिंदे गटातून सुरू तर नाही ना अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधणाऱ्या भावना गवळी यांना यवतमाळ येथे झालेल्या मेळाव्यात पंतप्रधानांनी अगदी प्रोटोकाॅल मोडून समोर बोलावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वाशीम दौऱ्यात भावना गवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला होता. असे असताना भावना गवळी यांनी या मतदारसंघात लोकसभा निवडणूक अनुषंगाने कामे सुरू केली आहेत. यवतमाळ येथे पंतप्रधानांचा महिलांचा मेळावा आणि वाशीम येथील यशस्वी मेळाव्यानंतर भावना गवळी यांचे तिकीट निश्चित झाले असताना अचानक त्यांना का विरोध करण्यात येत आहे. याविषयी अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

महिलांची मोठी शक्ती भावना गवळींच्या पाठीशी

यवतमाळ आणि वाशीम या दोन्ही जिल्ह्यांत महिलांचे मोठे संघटन भावना गवळी यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे त्यांना कितीही विरोध झाला तरी त्यांना तिकीट मिळाले की, त्या दिल्लीत प्रतिनिधित्व करण्यास सज्ज होतात. यवतमाळ आणि वाशीम या दोन्ही जिल्ह्यांत जनशिक्षण बचत गटाची उभारणी खासदार भावना गवळी यांनी केली. या तेरा हजार जनशिक्षण बचत गटाच्या माध्यमातून जवळपास दीड लाख महिला थेट भावना गवळी यांच्या संपर्कात कायम असतात. या बटत गटासाठी जिवाचे रान भावना गवळी यांनी केले आहे. त्यामुळे या बचत गटाच्या महिलादेखील भावना गवळी म्हणतील ती पूर्व दिशा ठरवितात. त्यामुळे महिलांचे दीड लाख परिवार आपसूक भावना गवळी यांच्या सोबत राहू शकतात. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांची फौज भावना गवळी यांच्याकडे आहे. मातृशक्तीच्या आशीर्वादाने यापूर्वी भावना गवळी यशस्वी झाल्या होत्या. यंदा मात्र त्यांची फरफट होते काय हे पाहण्यासारखे ठरेल.

R

Bhavana Gawali.
Akola News : अकोला पश्चिम पोटनिवडणूक; भाजपमधून गोवर्धन शर्मांच्या मुलासह १५ इच्छुक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com