Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाने छेडले व्हॉट्सॲप वॉर, पण नागपुरातून येणारा निरोपच महत्त्वाचा !

Dr. Parinay Fuke and Sunil Mendhe : सुनील मेंढे मुंबई, दिल्ली आणि नागपुरातही संपर्क साधून आहेत. दुसरीकडे डॉ. परिणय फुके हेसुद्धा उमेदवारीसाठी कंबर कसून कामी लागले आहेत.
Sunil Mendhe, Praful Patel and Dr. Parinay Fuke
Sunil Mendhe, Praful Patel and Dr. Parinay FukeSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : आचारसंहिता सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवसही जवळ येत चालला आहे. तरीसुद्धा एकाही पक्षाचा भंडारा-गोंदिया लोकसभेचा उमेदवार ठरता ठरत नसल्याने कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. असे असताना महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, कार्यकर्ते व्हॉट्सअॅपवर राष्ट्रवादीचा उमेदवार फायनल झाल्याचे मेसेज टाकून पेच तयार करत आहेत.

सोशल मीडियावर कितीही दावे प्रतिदावे केले तरी शेवटी नागपूर येथून येणारा निरोपच महत्त्वाचा असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. त्यामुळे भाजप आपली 'विनिंग सीट' सोडणार नसल्याचे निश्चित झाले आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस आहे. विद्यमान खासदार सुनील मेंढे मतदारसंघात भेटीगाठी कायम ठेवत मुंबई, दिल्ली आणि नागपुरातही संपर्क साधून आहेत. दुसरीकडे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके हेसुद्धा उमेदवारीसाठी कंबर कसून कामी लागले आहेत.

डॉ. फुके यांनी अखेरच्या टप्प्यात तिकिटासाठी मोर्चेबांधणी पक्की केली असल्याने या दोघांमध्ये तिकिटासाठी बरीच चुरस दिसत आहे. शेवटच्या क्षणी नागपुरातून येणारा निरोप महत्त्वाचा असेल, असे सांगितले जात आहे. खरा पेच राष्ट्रवादीचा आहे. खासदार प्रफुल पटेल यांनी स्वतःच्या उमेदवारीसाठी जाहीर इच्छा व्यक्त केल्यानंतर विदर्भातील अन्य मतदारसंघांवरही या गटाने दावा केला आहे. परिणामी महायुतीमधील पेच अधिक वाढला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Mendhe, Praful Patel and Dr. Parinay Fuke
Parinay Fuke : नुकसानभरपाईपासून लोक होते वंचित, डॉ. फुकेंनी असा खेचून आणला निधी!

दरम्यान, दोन दिवसांतील बदललेल्या वातावरणामुळे राष्ट्रवादीची स्थानिक नेतेमंडळी तातडीने मुंबईकडे रवाना झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते आपल्याला तिकीट मिळाले आहे, असा आवेश आणत प्रसारमाध्यमांवर तसा मेसेज व्हायरल करत पेच निर्माण करत आहेत. या परिस्थितीत मात्र राजकीय जाणकार आपले मत खंबीरपणे मांडताना दिसतात. भंडारा-गोंदिया लोकसभेवर भाजपचे कमळ फुलले असताना भाजप आपली विनिंग सीट घड्याळाला देणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.

या सर्व घडामोडींत नागपूर हे महत्त्वाचे ‘सेंटर’ ठरले असून, नागपूरवरून येणारा निरोपच महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा नागपूरवर लागलेल्या आहेत. मात्र, येत्या 24 तासांत कधीही उमेदवाराची घोषणा होऊ शकते. दुसरीकडे महायुतीचा उमेदवार ठरत नाही, तोवर महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता कमीच आहे. टक्कर कोण देऊ शकणार, याचा अंदाज घेत समाज शक्त्तीचाही वापर कसा करता येईल, यावर दिल्लीत कानमंत्र मिळाल्याचे सूत्र सांगतात. त्यामुळे महाआघाडीचे वेट अँड वॉच सुरू आहे.

Edited By : Atul Mehere

R

Sunil Mendhe, Praful Patel and Dr. Parinay Fuke
थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करत झापलं | MP Sunil Mendhe | Gondia Constituency |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com