Bhiwapur APMC Result : भिवापूरही काँग्रेसनेच बळकावली, भाजपला केवळ सात जागा !

Raju Parve : आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात विजय मिळविला.
Bhiwapur APMC
Bhiwapur APMCSarkarnaa

Nagpur District's Bhiwapur APMC Election Result News : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी ११ जागांवर विजय मिळवीत काँग्रेसने बाजार समितीवरील आपले वर्चस्व कायम राखले. शनिवारी (ता. ६) मतदान घेण्यात आले. रविवारी (ता. ७) मतमोजणी करण्यात आली. (The Congress maintained its dominance over the Bazar Committee)

कॉंग्रेसने भिवापूर बाजार समितीवर आपले वर्चस्व ठेवण्यास यश मिळविले आहे. विजयी उमेदवारांनी आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात विजय मिळविला. भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी शनिवारी मतदान घेण्यात आले होते. त्याची मतमोजणी काल रविवारी पार पडली.

सेवा सहकारी संस्था गटामधून ११ पैकी सहा जागांवर भाजप समर्थीत पॅनलचे दिलीप राऊत, अरविंद चौधरी, सुधाकर बोरकुटे, विद्या चौधरी, तुकाराम मोहड व किशोर मार्गनवार हे, तर काँग्रेस समर्थीत पॅनलचे पाच उमेदवार बाळू इंगोले, चंद्रशेखर ढाकुनकर, मिलिंद राऊत, सुरेश चौधरी व सुरेखा गोडे हे विजयी झाले.

ग्रामपंचायत मतदारसंघामधून काँग्रेस समर्थीत पॅनलचे जगन गावंडे, रजत चांभारे, सुशील मेश्राम व संजय देशमुख हे चारही उमेदवार विजयी झाले. व्यापारी/अडते मतदार संघामधून काँग्रेसचे राहुल गुप्ता व भाजप समर्थीत पॅनलचे आशुतोष मोरे यांनी विजयी झाले आहेत. हमाल मापारी संघामधून काँग्रेस समर्थीत नंदकिशोर धानोरकर यांनी यश प्राप्त केले. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी आमदार (MLA) राजू पारवे यांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा केला.

Bhiwapur APMC
Nagpur District APMC Analysis : सहकारात कॉंग्रेसचा दबदबा कायम, भाजपला आणखी एक संधी !

सभापती राऊत यांना हिसका..

लागोपाठ दोन टर्म (१० वर्ष) बाजार समितीचे सभापतिपद भूषविणारे काँग्रेसचे (Congress) विठ्ठल राऊत यांना मतदारांनी यावेळी चांगलाच हिसका दाखवला. त्यांना भाजप (BJP) समर्थीत पॅनलचे तुकाराम मोहड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. बाजार समितीचे (APMC) सचिव गोंगल यांची वारंवार पाठराखण करणे विठ्ठल राऊत यांना भोवल्याचे मत मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com