Nagpur District APMC Analysis : सहकारात कॉंग्रेसचा दबदबा कायम, भाजपला आणखी एक संधी !

BJP : भाजपला एकही बाजार समिती जिंकता आली नाही.
Raju Parve and sunil Kedar.
Raju Parve and sunil Kedar.Sarkarnama

Nagpur District APMC Elections Results Analysis : कृषी उत्पन्न बाजार समितींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने आपला दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले आहे. या निवडणुकांमध्ये भाजपला एकही बाजार समिती जिंकता आली नाही. त्यामुळे हे निकाल भाजप नेत्यांना विचार करायला लावणारे आहेत. (These results are thought provoking for BJP leaders)

माजी मंत्री आणि आमदार सुनील केदार यांच्या सावनेर तालुक्यात तर भाजपने लढण्याचीही हिंमत दाखवली नाही. तेथे केदारांनी बाजार समितीवर अविरोध सत्ता आणली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघारीनंतर सर्व १८ संचालक बिनविरोध निवडून आले. एकंदरीतच सहकार क्षेत्रात काँग्रेसचा दबदबा कायम असल्याचे चित्र जिल्ह्यातील पाच बाजार समितीच्या निवडणुकीतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. केंद्र व राज्यात सत्ता असताना आणि त्यातल्या त्यात केंद्रीय सहकारमंत्री त्यांचे असतानाही भाजपच्या ज्येष्ठ प्रमुख नेत्यांना बाजार समितीमध्ये यश मिळवता आले नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून सावनेर बाजार समितीवर आमदार केदार गटाची सत्ता राहिली आहे. यावर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणूक करण्यासाठी आमदार केदार गटाने सुरुवातीपासून फिल्डिंग लावली. त्यामुळे विरोधकांना पुढे येण्याची हिंमतच झाली नाही. एवढेच नव्हे तर १८ संचालकापदासाठी कोणत्याही गटाने उमेदवारी अर्ज सादर केला नाही. त्यामुळे केदार गटाची सत्ता अबाधित राहिली. सावनेर तालुक्यातील अनेक संस्थांवर केदार गटाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे विरोधक नामोहरम झाल्याची चर्चा आहे.

कुही-मांढळ येथे कॉंग्रेस नेते आमदार राजू पारवे बाजार समिती ताब्यात घेतली. सावनेर आमदार केदार यांनी अविरोध निवडून आणली. पारशिवणीमध्येही कॉंग्रनेच विजयाचा झेंडा रोवला. मौदा बाजार समितीमध्ये कॉंग्रेसने १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवला. येथे कॉंग्रेसच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने युती केली होती. पण ही युती काहीच प्रभाव दाखवू शकली नाही. एकंदरीतच सहकारमध्ये कॉंग्रेसच अव्वल हा संदेश नेत्यांनी एकजुटीतून दिला.

Raju Parve and sunil Kedar.
Washim District APMC Analysis : भाजपने देशमुखांमुळे राखले रिसोड, बाकी सर्वत्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच !

नागपूर पदवीधर मतदारसंघातून विजयाच्या मालिकेला कॉंग्रेसने सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, शिक्षक मतदारसंघ निवडणूक आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्येही कॉंग्रेसचाच वरचष्मा राहिला. ग्रामीण मतदार अद्यापही कॉंग्रेसच्या सोबत आहे, हे या निकालांनी दाखवून दिले, असे म्हणायला काही हरकत नाही.

भाजपला अजूनही संधी..

नागपूर (Nagpur) जिल्ह्यात एकूण सात बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम ठरला. त्यांपैकी कुही-मांढळ, सावनेर, रामटेक, पारशिवनी आणि मौदा या बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. आता उमरेड आणि भिवापूर या दोन बाजार समित्यांच्या निवडणुका होणे आहे. त्यांपैकी भिवापूर ६ मे, तर उमरेडची निवडणूक १३ मे रोजी आहे.

Raju Parve and sunil Kedar.
Gadchiroli District APMC Analysis : अहेरी, सिरोंचात दोन राजे एकत्र येऊनही आदिवासी विद्यार्थी संघटनेचाच जलवा !

या दोन निवडणुकांमध्ये (Elections) भाजपला (BJP) विजयाची संधी आहे. उमरेड बाजार समितीवर यापूर्वी भाजपची सत्ता होती. त्यामुळे येथे आता भाजप पूर्ण प्रयत्न करणार, यात शंका नाही. सोबत जोर लावल्यास भिवापूरही भाजपच्या ताब्यात जाऊ शकते. पण एकीने लढणाऱ्या कॉंग्रेस (Congress) नेत्यांसमोर भाजपचा टिकाव कुठवर लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com