Gadchiroli : गृहमंत्री अमित शाह करणार दोन प्रकल्पांचं भूमिपूजन, एकाचं लोकार्पण

Enthusiasm in BJP : कोनसरी प्रकल्प, वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग, चिचडोह बँरेजचा समावेश
Amit Shah in Gadchiroli.
Amit Shah in Gadchiroli.Google
Published on
Updated on

Amit Shah : माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळं चर्चेत राहणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भेट देणार आहेत. शनिवारी (ता. 9) शाह यांचा दौरा असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी व्यापक बंदोबस्त तैनात करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तोडगट्टा गावाजवळ सूरजागड प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आदिवासी नेत्यांनी ग्रामस्थांसह पोलिसांना घेरलं होतं. तेव्हापासून एटापल्ली तालुक्यात तणाव आहे. 20 नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेनंतर तालुक्यात दोन आठवड्यांसाठी कलम 144 लागू करण्यात आला होता.

अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन प्रकल्पांचं भूमिपूजन करणार आहेत. एका प्रकल्पाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. (Bhoomipujan For Two & Launch Of One Project By Hands Of Central Home Minister Amit Shah In Gadchiroli)

Amit Shah in Gadchiroli.
Gadchiroli News तोडगट्टाजवळ पोलिसांना घेरल्यानंतर संपूर्ण एटापल्लीत दोन आठवड्यांसाठी कलम १४४ लागू

शाह यांच्या दौऱ्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यांचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिस आणि भाजप कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. शाह यांच्या दौऱ्याबद्दल माहिती देताना खासदार अशोक नेते यांनी सांगितलं की, त्यांच्या हस्ते कोनसरी प्रकल्प, वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे. चिचडोह बँरेज पूर्णपणे तयार झालं आहे. त्यामुळं त्याचं लोकार्पणही शाह करणार आहे.

भाजपचे वरिष्ठ शाह यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे सर्व प्रकल्प गडचिरोलीसाठी मैलाचा दगड ठरणार आहेत. आदिवासीबहुल भाग व माओवादी कारवायांमुळं गडचिरोलीकडं आजपर्यंत कुणाचं लक्ष नव्हतं. परंतु केंद्रात भाजपचं सरकार व राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारनं गडचिरोलीकडं विशेष लक्ष केंद्रित केलं आहे, असं खासदार नेते म्हणाले. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत येऊन गेलेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळं गडचिरोलीतील प्रश्नांना न्याय मिळत असल्याचं ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडचिरोली जिल्ह्यात सूरजागड प्रकल्पामुळं उद्योगाचं मोठं जाळं उभारण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील कोनसरी येथे लायन्स मेटल कंपनीच्या माध्यमातून प्रकल्प सुरू झाला आहे. आगामी काळात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पोलाद प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठीची प्राथमिक कार्यवाही सुरू झाली आहे. गडचिरोलीत आता मोठे उद्योग येत असल्यानं त्याचा फायदा येथील आदिवासींना होणार आहे. अनेकांना त्यातून रोजगार मिळत आहे. कोनसरी प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. विशेषत: भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्यात येत आहे, असं खासदार नेते यांनी सांगितलं.

गडचिरोलीतील अनेक युवक कोनसरी प्रकल्पात काम करण्यास इच्छुक आहेत. गडचिरोलीत वाढते उद्योगाचे जाळे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. अशात अमित शाह यांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाह यापूर्वीच गडचिरोलीत येणार होते. मात्र, तेलंगणा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यानं त्यांचा दौरा पुढं ढकलण्यात आला होता. आता शाह जिल्ह्यात येणार असल्यानं गडचिरोलीतील अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यातून येथील महत्त्वाचे विषय केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं खासदार अशोक नेते यांनी सांगितलं. या वेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा भाजपचे जेष्ठ नेते बाबूराव कोहळे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी आदी उपस्थित होते.

Edited by : Prasannaa Jakate

Amit Shah in Gadchiroli.
Gadchiroli Congress : रानटी हत्ती, वाघांचा धुमाकूळ रोखण्यासाठी काँग्रेसचा ठिय्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com