Sudhir Mungantiwar News : पालकमंत्री मुनगंटीवारांच्या गोंदिया जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीचा अजब फतवा, प्रेमविवाह कराल तर...

Vidarbha Politics : ...या मुद्द्यावरून मंत्री सुधीर मुनगंटीवारांना विरोधक घेरण्याची शक्यता!
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Gondia News : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री असलेल्या गोंदिया जिल्हा शुक्रवारी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने विवाह नोंदणीबाबत घेतलेला ठराव चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने आता प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना घरच्यांची परवानगीची सक्ती केली आहे. आणि ही परवानगी असेल तरच ग्रामपंचायत कार्यालयात विवाह नोंदणी केली जाईल, असा असा ठराव केला आहे. दरम्यान, ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर प्रेमीयुगलांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या मुद्द्यावरून मंत्री सुधीर मुनगंटीवारांना(Sudhir Mungantiwar) विरोधक घेरण्याची शक्यता आहे.

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar News : पाटेकरांनी वाघनखांवरून मुनगंटीवारांचा काढला 'कोथळा'; मुनगंटीवार म्हणतात, 'नानांनी माझं कौतुक केलं...

पुण्याच्या "राइट टू लव्ह" या संघटनेनं या वादात तिने उड़ी घेत नानव्हा ग्रामपंचायतीला नोटीस पाठविली आहे. नानव्हा गावचे सरपंच सर्व पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ही ठराव नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत रद्द करण्यास सांगितले आहे. तसेच नोटीस नमूद कालावधीमध्ये ठराव रद्द न केल्यास ग्रामपंचायतीच्या सर्व सभासदांवर व अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाईची करणार असल्याचे सांगितले आहे.

नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाहाला घरच्यांची परवानगी असे ठराव ग्रामसभेत बहुमताने मंजूर केला आहे. यावर शासनाचे मार्गदर्शन मागितले आहे. सरकारने आंतरजातीय विवाहात वाढ व्हावी म्हणून आर्थिक पाठबळसारख्या अनेक योजना आणल्या आहे. असे असले तरी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात प्रेमविवाहाला विरोध करण्यासारख्या घटना वाढत आहेत. ऑनरकिलिंगचे प्रकारही वाढत आहेत. त्यात आता नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाहसाठी घातलेली अट अधिक जाचक ठरली आहे.

दरम्यान, पुण्यातील “राइट टू लव्ह” ही संघटना विवाहित प्रेमीयुगलांच्या हक्कासाठी लढते आहे. ही बातमी त्यांना कळताच त्यांनी लगेच नानव्हा ग्रामपंचायत सरपंच यांना फोन केला आहे. राइट टू लव्ह संघटना पुणेचे रोशन मोरे यांनी नानव्हा ग्रामपंचायत सरपंच गौरीशंकर बिसेन यांना कॉल करून नोटीस बजावली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील 'राइट टू लव्ह' संघटनेचे मोरे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतीनं आई-वडिलांची प्रेम विवाहाला संमती नसेल, तर त्या प्रेमविवाहाची नोंद करण्यास नकार दिला आहे. तसा ठरावही पास करून घेतला आहे. हा ठराव बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे, असा ठराव करण्याचा ग्रामपंचायतीला कोणताच अधिकार नाही. (Gram Panchayat)

Sudhir Mungantiwar
Aaditya Thackeray Nagpur Tour : नागपुरात येऊनही आदित्य ठाकरेंची ओबीसी आंदोलनाकडे पाठ; चर्चांना उधाण

आपलं संविधान आपल्याला जोडीदार निवडण्याचा अधिकार देते; मग तो जोडीदार कोणत्याही जाती धर्मातला असला तरी तो निवडण्याचा अधिकार सर्वाना आहे. दरम्यान, सरकारच्याही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून योजना असताना अशा ठरावामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन होत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sudhir Mungantiwar
Beed NCP Politics : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या बांधणीपेक्षा 'गटबाजी'च मजबूत; क्षीरसागर पुतण्यांचं वर्चस्व मोडीत..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com