Mumbai : मुंबई पोलिस दलात तीन हजार 'बाउन्सर' (कंत्राटी सुरक्षारक्षक) नेमण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतला आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या या निर्णयावर निशाणा साधत खिल्ली उडवली आहे.
"अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार तीन हजार 'बाउन्सर' (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही का?, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने बृहन्मुंबई पोलिसांच्या आस्थापनेवर तीन हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश कुणाच्या भल्यासाठी आणि कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला? शासनाला तीन हजार मनुष्यबळ हवे आहे, तर त्यासाठी भरतीची प्रक्रिया का राबविण्यात येत नाही, असे सुळे यांनी टि्वट करीत सरकारला जाब विचारला आहे.
"मुंबईसारखे अतिसंवेदनशील शहर कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या हाती देण्यात कोणते शहाणपण आहे? पोलिस भरतीसाठी जिवाचे रान करणारे तरुण-तरुणी या सरकारला दिसत नाहीत का? त्यांचा हक्क का हिरावून घेतला जातोय? गृहमंत्री फडणवीसांनी याचे जनतेला उत्तर दिले पाहिजे," असे सुप्रिया सुळेंनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही सडकून टीका केली आहे.
सध्या पोलिसांची कमतरता असल्याने मुंबई पोलिसांवर ताण आहे. नवीन भरती प्रक्रिया कधी सुरू होईल हे अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे राज्य सरकारने ११ महिन्यांसाठी राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी ३० हजार कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.