Assembly Election 2023 : तीन राज्यांतील विजय पंतप्रधान मोदींवरील विश्वासाचं प्रतीक

BJP Celebration : खासदार सुनील मेंढे, राणा, पटेल, माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुकेंचे ठाम मत
MP Sunil Mendhe celebrating at Bhandara.
MP Sunil Mendhe celebrating at Bhandara.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : देशाला विश्वगुरू करण्याच्या स्वप्नाने प्रेरित होत सातत्यानं विकासासाठी प्रयत्नरत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर लोकांचा आजही विश्वास आहे, याचे प्रतीक म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीतील विजय आहे, असं भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे म्हणाले.

भाजपच्या तीन राज्यांतील विजयानंतर खासदार मेंढे यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी भंडारा येथे विजयोत्सव साजरा केला. (BJP Celebrates Success At Bhandara In Madhya Pradesh, Rajasthan & Chhattisgarh Assembly Election 2023 In Presence Of MP Sunil Mendhe Former Minister Parinay Fuke Also Greets PM Narendra Modi)

MP Sunil Mendhe celebrating at Bhandara.
Assembly Election 2023 : गडकरींकडून अभिनंदन, फडणवीसांच्या चेहऱ्यावर आनंद

भाजपला तीन राज्यांत घवघवीत यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जो विकासाचा मंत्र देशाला दिला आहे, त्याचा हा परिणाम असल्याचं खासदार मेंढे म्हणाले. ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेने भाजपला स्वीकारलं आहे. कल्याणकारी योजना, आरोग्य सुविधा, लोकांच्या मनातील विषयांना हात घालत भाजपनं देशाची वाटचाल महासत्तेकडं केली आहे, असं खासदार मेंढे या वेळी म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील हा विजय केवळ सुरुवात आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पूर्णपणे सफाया मतदार केल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप आध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सातत्यानं राष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी काम केलंय. त्याचेच हे फलित असल्याचं मेंढे यांनी नमूद केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भंडाऱ्यात आनंदोत्सव

तीन राज्यांतील विजयाचा आनंद राज्याचे माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनीही व्यक्त केला. भाजपला मिळालेलं हे यश अभूतपूर्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, तीनही राज्यांतील निवडणूक प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, निवडणूक प्रभारी यांचं हे यश असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. विकासाला प्राधान्य दिलंय. त्यामुळं मतदारांनाही भाजपच हवीय, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याचं डॉ. फुके म्हणाले.

विजयानंतर लाखनी येथे भाजपच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे या वेळी उपस्थित होते. डॉ. फुके यांनी विरोधकांवर जोरदार शाब्दिक प्रहार केला. विधानसभा निवडणुकीतील विजयानं साऱ्यांची तोंडं बंद झालीत, असं ते म्हणाले.

MP Sunil Mendhe celebrating at Bhandara.
Parinay Fuke : गोवारी समाजावरून परिणय फुकेंचा महाविकास आघाडीवर घणाघात; म्हणाले...

वाघ तो वाघच असतो

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं की, विरोधकांनी एकत्र येत जंगलातील वाघावर हल्ला करण्याचा प्रचंड केला. हल्ला करणारे सारेच एका ‘झुंड’मध्ये आले होते. परंतु वाघ तो वाघच असतो, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी नावाचा जादू कालही कायम होता, आजही कायम आहे, असं त्या म्हणाल्या. अनेकांनी मोंदींचा शब्दांनी अपमान केला. अपशब्द वापरले. त्यांना मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रातील काही नेते सकाळी 9 वाजतापासून मोंदीविरोधात बोलणं सुरू करायचे. त्यांचीही तोंडं यातून बंद झाल्याचं नमूद करीत खासदार राणा यांनी ठाकरे गटावर टीका केली.

नेतृत्वाचं यश

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तीन राज्यांतील भाजपचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचं यश असल्याचं नमूद केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएचा समर्थक या नात्यानं मोदींचं यासाठी अभिनंदन करतो. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विजय हा अभूतपूर्व असाच आहे. राष्ट्राप्रती असलेल्या समर्पण भावनेमुळंच मतदारांनी भाजपच्या पदारात विजय टाकल्याचं खासदार पटेल यांनी म्हटलंय.

Edited by : Prasannaa Jakate

MP Sunil Mendhe celebrating at Bhandara.
Assembly Election Result 2023 : कौल ४ राज्यांचा, चाहूल लोकसभेची

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com