Assembly Election 2023 : गडकरींकडून अभिनंदन, फडणवीसांच्या चेहऱ्यावर आनंद

BJP Celebration : तीन राज्यांतील विजयानंतर नागपूर, अमरावती, अकोल्यासह विदर्भात उधळला गुलाल
Chandrashekhar Bawankule drumming at Nagpur.
Chandrashekhar Bawankule drumming at Nagpur.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केला.

गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं अभिनंदन केलं, तर उपराजधानी नागपूर येथे दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील आनंद रविवारी (ता. 3) लपत नव्हता. (Celebration Of BJP In Vidarbha After Success in Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh Assembly Election 2023 Nitin Gadkari, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule Express Happyness)

Chandrashekhar Bawankule drumming at Nagpur.
Madhya Pradesh Election Result 2023 : मध्य प्रदेशात पुन्हा उमललं कमळ; शिवराजसिंह चौहानांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

गडकरींकडून प्रचार

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही प्रचार केला होता. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ते म्हणाले की, तीनही राज्यांतील मतदारांनी ‘दूध का दूध और पानी का पानी’ केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे. पी. नड्डा यांचं यासाठी अभिनंदन करतो. तीनही राज्यांतील भाजप नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जे श्रम घेतले त्याचं हा विजय म्हणजे फलित आहे. आगामी काळातही मतदार भाजपवर असाच विश्वास दाखवतील, यात कोणतीही शंका नसल्याचं गडकरी यांनी नमूद केलं.

‘आज मी आनंदी’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हास्यमुद्रेने प्रसारमाध्यमांना द्यायचा तो संदेश दिला. विमानतळावर फडणवीस म्हणाले, ‘मी आताच कोणत्याही विषयावर बोलणार नाही. मी फक्त अत्यंत आनंदी झालोय एवढच सांगेल.’ विधानसभा निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये फडणवीस यांनीदेखील भाजपचा प्रचार केला होता. यासंदर्भात विचारल्यानंतर फडणवीस म्हणाले, ‘यासंदर्भात आपण सविस्तर व नंतर बोलूया. आता मी अत्यंत आनंदी आहे, एवढच सांगेन.’ तीन राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांनंतर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये भाजप खासदार, आमदार, नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, पेढे वाटत, ढोल-ताशे वाजवत जल्लोष केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रदेशाध्यक्षांनी वाजविला ढोल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ढोल वाजवत भाजपच्या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील विजयोत्सवात सहभाग घेतला. नागपूर पूर्वचे भाजप आमदार कृष्णा खोपडे या वेळी उपस्थित होते. या वेळी बावनकुळे म्हणाले, तीन राज्यांतील विजयानंच विरोधकांना काय ते प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांनी भाजपला खाली खेचण्यासाठी बरीच तडफड केली, परंतु यात त्यांना यश आले नाही. मतदारांचा आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर पूर्ण विश्वास आहे, असं ते म्हणाले.

काँग्रेसला अहंकार नडला

अमरावती येथेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजापेठ परिसरात असलेल्या भाजप कार्यालयापुढं आनंदोत्सव साजरा केला. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या वेळी ढोल-ताशांवर नृत्यही केलं. या वेळी खासदार डॉ. बोंडे म्हणाले, काँग्रेसला अहंकार नडला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अनेकदा खालच्या पातळीवर जात टीका केली. परंतु मतदारांनी त्यांना दाखवून दिलं, की खरा ‘पनौती’ कोण आहे. काँग्रेसच्या अहंकाराला ही मोठी चपराक आहे. ज्यावेळी मोदी यांना काँग्रेसने ‘मौत का सौदागर’ म्हटलं तेव्हा गुजरातमधून काँग्रेस हद्दपार झाली. ‘चौकीदार चोर है’ म्हटलं तेव्हा लोकसभेतून गायब झाली. आताही काँग्रेसनं अपशब्दाचा वापर केला तर तीन राज्यांतून त्यांचा सुपडासाफ झाला.

BJP leaders celebrating victory in Madhya Pradesh, Rajasthani & Chhattisgarh assembly elections at Akola.
BJP leaders celebrating victory in Madhya Pradesh, Rajasthani & Chhattisgarh assembly elections at Akola.Sarkarnama

अकोला येथे मिठाई वाटप

अकोला जिल्हा भाजपनं विधानसभा निवडणूक निकालांनंतर खुलेनाट्यगृह परिसरात असलेल्या जिल्हा कार्यालयातून विजय रॅली काढली. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील, डॉ. अशोक ओळंबे, गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा यांनी कार्यकर्त्यांना पेढे भरवत जल्लोष केला.

भाजपचा ‘दटके’ लढा

तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपनं विरोधकांचा ‘दटके मुकाबला’ केला, असं ठामपणं नमूद करता येईल, असं आमदार प्रवीण दटके म्हणाले. नागपुरातील महाल भागात आमदार दटके यांच्या नेतृत्वात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. दटके म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा आणि भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं हे फळ आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Chandrashekhar Bawankule drumming at Nagpur.
Rajasthan Assembly Results 2023 : भाजपने बहुमताचा आकडा गाठला; राज्यवर्धन सिंह राठोड पिछाडीवर, पायलट आघाडीवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com