Maratha Vs OBC : 'माधव' फॉर्म्युल्यातील 'मा' गायब; विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढणार?

Mali, Dhangar, Wanjari : माळी-धनगर-वंजारी या 'माधव' फॉर्म्युल्यामुळे माळी समाजाला भाजपकडून सर्वाधिक अपेक्षा होती. काँग्रेसने उपेक्षा केल्याने हा समाज भाजपकडे झुकला होता.
Maharashtra State
Maharashtra StateSarkarnama

राजेश चरपे

Maharashtra Political News : आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजात चांगलाच वाद पेटला असताना माळी समाजाने वेगळी राजकीय भूमिका घेण्याचे ठरवले आहे. सर्वच राजकीय पक्ष आमच्या समाजाला गृहित धरतात, निवडणुकांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे आगामी विधान परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या माळी समाज हक्क परिषद आता कुठल्या पक्षाच्या बाजूने झुकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माळी-धनगर-वंजारी या 'माधव' फॉर्म्युल्यामुळे माळी समाजाला भाजपकडून सर्वाधिक अपेक्षा होती. काँग्रेसने उपेक्षा केल्याने हा समाज भाजपकडे झुकला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने फॉर्म्युलातून ‘मा‘ काढून टाकला. माळी समाजाच्या एकाही उमेदवाराला तिकीट दिले नाही. त्यामुळे मोठी नाराजी आहे.

जरांगे पाटील Manoj Jarange यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत पाडण्याचे आवाहन केले आहे. सोबतच विधानसभेची निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाचे आरक्षण शाबूत राखण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे.

Maharashtra State
Uddhav Thackeray Vs Raj Thackeray : तुमच्याकडं ना आमदार ना खासदार, पाठिंब्याचा...; अमित ठाकरेंना 'या' नेत्यानं सुनावलं

जरांगे यांच्या आंदोलनामुळे आधीच युती सरकार हतबल झाले आहे. मराठ्यांना होकार दिला तर ओबीसी नाराज होतो. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था सरकारची झाली आहे. यात माळी समाजाने सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यास महायुती समोरच्या अडचणी आणखीच वाढू शकतात.

लोकसभा निवडणुकीच्या Lok Sbaha निकालावरून महायुती आधीच धास्तावली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मागितली होती. नंतर राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नावाचा विचार केला नाही. ते नाराज असल्याचे कळते. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे असेही बोलेले जात आहे.

महाराष्ट्रात माळी समाजाची लोकसंख्या 11 टक्के आहे. असे असताना लोकसभेत एकच उमेदवार देण्यात आला. दुसरीकडे मराठा-कुणबी समाजाची लोकसंख्या 16 टक्के असताना त्यांना 35 जागा देण्यात आल्या. 1978 च्या तुलनेत समाजाच्या लोकप्रतिनिधींची संख्या एक तृतीयांश कमी झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाच्या प्रतिनिधींची संख्या जेमतेम आहे. माळी समाजाने काही ठोस भूमिका जाहीर केल्यास सर्वच मोठ्या पक्षांच्या अडचणी वाढू शकतात.

(Edited by Sunil Dhumal)

Maharashtra State
J. P. Nadda : जे. पी. नड्डा यांना मंत्रिपदासह आणखी मोठी नवी जबाबदारी मिळणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com