Video Ramesh Kuthe News : गोंदियात भाजपला मोठा झटका; माजी आमदार रमेश कुथे यांचा राजीनामा....

Politics News : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीमधील कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत. विशेषतः विदर्भात महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे.
Ramesh Kuthe
Ramesh Kuthe Sarkarnama

Gondiya News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागल्याने कार्यकर्त्यांत नाराजी दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीमधील कार्यकर्ते चलबिचल दिसत आहेत. विशेषतः विदर्भात महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे.

गोंदिया विधानसभेवर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले व सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार रमेश कुथे (Ramesh Kuthe) यांनी शुक्रवारी भाजपच्या (Bjp) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कुथे यांनी राजीनामा दिल्याने गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ( Ramesh Kuthe News)

'माझ्या समर्थकांकडून मला भाजप सोडण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे मी भाजपपासून दूर होत आहे.' असे राजीनामा पत्र रमेश कुथे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

विशेष म्हणजे आठवड्याभरापूर्वीच मध्यरात्रीच्या सुमारास काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रमेश कुथे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. या भेटीमुळे गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे लवकरच माजी आमदार रमेश कुथे भाजपला रामराम करतील अशी चर्चा रंगली होती.

Ramesh Kuthe
Onion Politics : धक्कादायक! भाजप संशयाच्या फेऱ्यात? नाफेड अध्यक्षांनीच केला भांडाफोड

अखेर शुक्रवारी माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी येत्या काळात कोणत्या पक्षात प्रवेश करणार या संदर्भात अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे येत्या काळात ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे.

Ramesh Kuthe
Congress Agitation Vs BJP : काँग्रेस महायुती सरकारविरोधात 'चिखल फेको' आंदोलन करणार!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com