Nagpur BJP News : लोकसभेत मतदानात फटका बसल्यानंतर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नागपूर भाजप दक्ष!

Nagpur BJP Meet Collector for Voter List : भाजपच्या शिष्टमंडळाने मतदार याद्यांमधून तब्बल 1 लाख 94 हजार 836 गायब झालेल्या मतदारांची यादीच जिल्हाधिकाऱ्यांना सोपवली.
BJP
BJPSarkarnama

Nagpur BJP and Vidhan sabha Election : लोकसभेच्या निवडणुकीत बसलेला फटका आणि घसरलेला मतदानाचा टक्का यामुळे भाजपचे आमदार आणि पदाधिकारी खडबडून जागे झाले आहे. गुरुवारी भाजपच्या शिष्टमंडळाने मतदार याद्यांमधून तब्बल 1 लाख 94 हजार 836 गायब झालेल्या मतदारांची यादीच जिल्हाधिकाऱ्यांना सोपवली. हे कोणी केले अशी विचारण करून विधानसभा निवडणुकीच्या आधी या सर्वांची नावे याद्यांमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

दक्षिण नागपूचे आमदार मोहन मते, शहर प्रमुख बंटी कुकडे यांच्यासह आजी-माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची भेट घेतली. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे 75 टक्के मतदानाचे उद्धिष्ट ठेवले होते. या बळावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी पाच लाखांच्या मताधिक्यांनी निवडूण येणार असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात 54 टक्केच मतदान झाले. गडकरी अवघ्या एक लाख 37 हजार मतांनी निवडून आले.

BJP
Parinay Phuke-Kripal Tumane : फुके, तुमानेंचे राजकीय वजन वाढले; आमदार होण्यापूर्वीच ‘भावी मंत्री’ म्हणून चर्चेत!

शहरातील सर्व सहा मतदारसंघातून गडकरी यांना अपेक्षित मतदान झाले नाही. काही मतदारसंघातील मताधिक्य मागील निवडणुकीच्या तुलनेत घटले. हे बघता भाजपसाठी(BJP) आगामी विधानसभेत धोक्याची ही घंटी समजल्या जात आहे. निवडणुकीनंतर अनेकांची नावे मतदार याद्यांमधून गहाळ झाल्याचे निर्दशनास आले होते. मतदानाच्या दिवाशी अनेकांनी आपली नाराजी दर्शवली होती. निवडणूक व मतदार याद्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात होती. याचा फटका भाजपला मोठा बसल्याचे समोर आले आहे.

याप्रकारानंतर विधानसभा मतदारसंघत निहाय गहाळ झालेल्या मतदारांची यादी भाजपने तयार केली आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील 30 हजार 121, आमदार मोहन मते यांच्या दक्षिण नागपूरमधील 37 हजार 188, नितीन गडकरी यांना सर्वाधिक 80 हजारांचे मताधिक्य देणाऱ्या पूर्व नागपूरमधील 33 हजार 349, मध्य नागपूरमधील 28 हजार 960, आमदार विकास ठाकरे यांच्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील 28 हजार 294 आणि उत्तर नागपूरमधील 36 हजार 194 मतदारांचा समावेश आहे. असे एकूण 1 लाख 94 हजार 826 मतदार आहेत.

BJP
Nagpur Politics : नागपूरचे राजकीय वजन वाढले! तुमाने, फुकेंमुळे जिल्ह्यात 17 आमदार

याशिवाय मतदार यादीत नावे असलेल्या 33 हजार 424 मतदारांच्या नावापुढे ‘डिलिटेड' असा ठप्पा मारण्यात आला आहे. त्यांना मतदान करता आले नाही. हे कोणी केले अशीही विचारण भाजपच्यावतीने करण्यात आली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com