Nagpur Politics : नागपूरचे राजकीय वजन वाढले! तुमाने, फुकेंमुळे जिल्ह्यात 17 आमदार

first time such a large number of MLA in Nagpur District Sarkarnama analysis : आता नागपूर जिल्हा 17 आमदारांचा होणार आहे. यात विधानसभेचे बारा आणि पाच आमदार विधान परिषदेचे सदस्यांचा समावेश आहे.
Nagpur Politics
Nagpur Politics Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना शिवसेनेने आणि भाजपने परिणय फुके यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने राज्यात नागपूरचे राजकीय वजन वाढले आहे. या दोघांमुळे आता नागपूर जिल्हा 17 आमदारांचा होणार आहे. यात विधानसभेचे बारा आणि पाच आमदार विधान परिषदेचे सदस्यांचा समावेश आहे.

विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त झाल्या आहेत. विधान परिषदेसाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस होती. भाजपने आपल्या कोट्यातील 5 उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली. त्यात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून गेलेले, माजी राज्यमंत्री परिणय फुके यांचा समावेश होता.

Nagpur Politics
Krupal Tumane : मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला; अखेर तुमाने आणि भावना गवळींचे राजकीय पुनर्वसन

फुके हे नागपूरकर आहेत. भाजपचे यवतमाळ जिल्ह्यातील नीलय नाईक यांचाही विधान परिषदेचा कार्यकाळ संपला आहे. त्यांची जागा फुके यांनी पटाकवली. काँग्रेसचे यवतमाळ जिल्हातील वजाहत मिर्झा यांचाही कार्यकाळ संपला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने दोन्ही जागा विदर्भाला दिल्या आहेत. यात माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचा समावेश आहे. तुमाने हे सुद्धा नागपूरकर आहेत. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून यापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि आमदार प्रवीण दटके परिषदेत आहेत. नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधी ॲड. अभिजीत वंजारी विधान परिषदेत काँग्रेसचे प्रतोद आहेत. हे सर्व नागपूरचे आहेत.

Nagpur Politics
Parinay Phuke : फुकेंचा होकारच ठरला टर्निंग पॉइंट !

देवेंद्र फडणवीस, भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच 17 आमदारांमुळे नागपूर जिल्ह्याचे राजकीय वजन राज्यात वाढले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ अनुक्रमे भंडारा आणि गोंदिया असला तरी त्यांचा स्थायी मुक्काम नागपूरलाच असतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com