Uddhav Thackeray On BJP : भाजप राजकारणातील नामर्द; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray In Amravati : राज्यात भाजपला शिवसेनेनेच मोठे केले
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray On Vidarbh Tour : जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणाऱ्यांना दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागत आहे. देशातील सर्व विकून दुसऱ्या पक्षांतील लोकांना विकत घेण्याची भाजपवर का वेळ आली? हातात सर्व यंत्रणा असतानाही भाजपला जिंकून येण्याचा आत्मविश्वास राहिला नाही. यातून विरोधकांना संपवण्याचा डाव भाजपचा असल्याचा आरोप करून भाजप ही राजकारणातील नामर्द असल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. (Latest Political News)

उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सोमवारी (ता. १०) अमरावती येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, "पक्ष चोरला, चिन्ह चोरले मग ठाकरेंकडे राहिलंय काय, असे त्यांना वाटत असेल. मात्र गावातगावात लोक वाट पाहत होते. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. असे असतानाही लोक माझ्यासाठी थांबतात. त्यामुळेच तुम्ही माझ्यासाठी देव आहात. हे भाग्य खुर्चीत बसलेल्यांच्या नशिबात नाही ते माझ्या नशिबात आहे."

Uddhav Thackeray
Wai News : 'किसन वीर'ला मदत मिळू नये म्हणणारे आता कारखाना वाचवण्यासाठी अजितदादांसोबत : मदन भोसले

ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री असताना घरात बसून काम केल्याची टीका झाली आहे. या टीकेचाही ठाकरे यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले, "मी घरी बसून काम केल्याची ते वारंवार टीका करत आहेत. हो मी घरी बसून काम केले. त्या कामाच्या जोरावरच मी लोकांच्या मदतीमुळे क्रमांक एकचा मुख्यमंत्री होतो. घरी बसून असलो तरी मी कुणाची घरे फोडले नाही. घरी बसून राज्यातील लोकांची कामे केली. आता तुम्हाला दारोदारी जावे लागते आहे. तरी त्यांना लोक विचारत नाहीत. त्यामुमळे अनेक अधिकाऱ्यांना, शिक्षकांना त्यांची कामे सोडून जनता म्हणून कार्यक्रमाला बोलवावे लागत आहे."

Uddhav Thackeray
Rohit Pawar Question to Rebels: तुमच्या भाजपविरोधी भूमिकेचं काय झाले? ; रोहित पवारांचा बंडखोरांना सवाल

यावेळी ठाकरे यांनी भाजपला शिवसेनेने मोठे केल्याचा दावा केला. तसेच राजकारणात भाजप ही नामर्द असल्याची टीकाही केली. उद्धव ठाकरे म्हणाले, "घरी बसलो तरी मुख्यमंत्री माझे नाव क्रमांक एकवर होते. मात्र जगातील क्रमांक एकचे पंतप्रधान असेलेल्या पक्षाला लोक विकत घ्यावे लागत आहेत. आपले आहे ते विकायचे आणि दुसऱ्याचे चोरून घ्यायचे. भाजपला सत्तेची मस्ती आली आहे.मात्र ताकद असूनही भाजपला जिंकून येण्याचा आत्मिवश्वास नाही. विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरू केले आहे. यंत्रणाांचा वापर करणे बंद करा आणि मैदानात या, मग बघू काय होतेय ते. राजकारणातील नामर्द तुम्ही. राज्यात कधी तुमची ताकद होती? हा संपूर्ण महाराष्ट्रही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तुमचे दोन खासदार होते. कोण तुम्हाला विचारत होते? त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला खांद्यावर बसवून राज्यभर फिरविले."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com