Wai News : 'किसन वीर'ला मदत मिळू नये म्हणणारे आता कारखाना वाचवण्यासाठी अजितदादांसोबत : मदन भोसले

Madan Bhosale News: मदन भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की कारखान्याचे कारण पुढे करुन अवघ्या दोन दिवसांत भूमिका बदलण्याची किमया आमदार मकरंद पाटील यांनी केली आहे
Madan Bhosale, Makrand Patil
Madan Bhosale, Makrand Patilsarkarnama
Published on
Updated on

-विलास साळुंखे

Madan Bhosale News : कोणी कुठं जावे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. मात्र, शरद पवार यांच्या दौर्‍यात त्यांच्या गाडीत फिरुन, दुसर्‍या दिवशी मेळाव्यात अखेरच्या श्‍वासापर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगून पुन्हा अजित पवार यांच्या गटात सहभागी झालेल्या आमदार मकरंद पाटील यांनी कारखाना वाचवण्याचे कारण पुढे केले आहे. त्यांचे हे कारण सत्य असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे शासन सत्तेत असताना कारखान्याला शासनाचे सहकार्य, बँकांची मदत मिळू नये यासाठी का प्रयत्न केले, असा सवाल माजी आमदार मदन भोसले यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी आमदार मदन भोसले यांनी म्हटले आहे, की ज्या कारखान्याचे कारण पुढे करुन अवघ्या दोन दिवसांत भूमिका बदलण्याची किमया आमदार मकरंद पाटील Makrand Patil यांनी केली. राष्ट्रवादीत फूट पडल्यादिवशी अजित पवार Ajit Pawar यांच्यासोबत असणारे श्री. पाटील दुसर्‍या दिवशी मात्र, शरद पवार Sharad Pawar यांच्यासोबत फिरले. सोबत राहण्याच्या आणाभाका घेवून तिसर्‍या दिवशी ते जाहीरही केले. त्यावेळी निष्ठेचा सूर आळवून तात्या असते तर काय भूमिका घेतली असती हे सांगून मरेपर्यंत शरद पवार यांना सोडणार नाही, असे दृढतापूर्वक सांगितले.

माध्यमांमध्येच या सर्व बदलत्या घडामोडी वाचण्यास मिळाल्या. हे एक़ा जागी स्थिर झाल्याचे दिसत असताना पुन्हा दोन दिवसांनी मात्र त्यांनी शरद पवार यांना दिलेल्या शब्दापासून फारकत घेतली. या बदलत्या भूमिकेपाठी किसन वीर कारखान्याचे हित असल्याची जी बतावणी त्यांनी केली ती न पटणारी आहे. मुळातच या कारखान्याचे हित त्यांच्या हृदयात नाही.

कारण कारखान्याला मदत मिळू नये यासाठी शासन व बँकांच्या दरबारी प्रयत्न केले ते यांनी. किसन वीरच्या कार्यक्षेत्रातील ऊस इतरत्र वळवला तो यांनीच. इतर कारखान्यांसाठी किसन वीरच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी शुभारंभ करताना फडात जावून नारळ फोडले. आपल्या कारखान्याचा ऊस अन्य कारखान्यांनी न्यावा यासाठी ठिकठिकाणी एजंट नेमले.

Madan Bhosale, Makrand Patil
Satara News : आरएसएसने फुले दांपत्याचा अपमान करूनही भुजबळ सत्तेत : लक्ष्मण माने

कारखाना ना माझ्या मालकीचा आहे ना त्यांच्या. तो सर्व शेतकरी, सभासदांच्या मालकीचा आहे. या कारखान्याच्या सत्तेत तेही आले गेले आणि आम्हीही. अशा परिस्थितीत संस्थेचे हित अविरत जपायचे असते. ती भावना हृदयात असावी लागते. उगाच आपल्या राजकीय स्वार्थासाठी, तीन दिवसांत बदलत गेलेल्या तीन वेगवेगळ्या भूमिकांसाठी त्याचा वापर करणे योग्य नाही.

काल शरद पवारांना मरेपर्यंत सोडणार नाही म्हणत दोन दिवसात पुन्हा आपली भूमिका बदलत भाजपा, सेनेसोबत आलेल्या अजितदादांसोबत येणार्‍या आमदार मकरंद पाटील यांनी किसन वीर कारखान्याची ढाल पुढे करु नये, असेही मदन भोसले यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

Madan Bhosale, Makrand Patil
Satara NCP News : शशिकांत शिंदेंनी अजितदादांना स्पष्टच सांगितले, राष्ट्रवादीचे कुटुंब पुन्हा एकत्र आणणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com