BJP Is Our Elder Brother : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शरद पवार यांनी मोठी खेळ केली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवी वेट नेते प्रफुल्ल पटेल हे काँग्रेसला लहान भाऊ म्हणत होते. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या खेळीनंतर पटेल अजित पवारांच्या नेतृत्वात महायुतीत सामील झाले. आता भाजप आमचा मोठा भाऊ आहे, असे ते म्हणत आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. विदर्भाचा विचार केल्यास या दोन जिल्ह्यांत राष्ट्रवादी सर्वाधिक बळकट आहे. सहाजिकच ही जागा मागणे अपेक्षित आहे, असे म्हणत खासदार प्रफुल पटेल यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा ठोकला आहे. राज्यात सर्वाधिक खासदार भाजपचे असल्याने त्यांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणुका लढणार असल्याचे सांगण्यासह प्रफुल पटेल विसरत नाहीत.
महायुती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर ठेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. महायुतीला तीनही पक्षांनी एकमेकांना साथ देण्याचे ठरवले आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीनही पक्षाचे प्रतिनिधित्व असावे. एखाद्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा उमेदवार नसला तरी युती धर्म म्हणून मित्रपक्षांना मदत करण्याचे ठरले आहे. सध्या जागा वाटपावर कुठलीही चर्चा झालेली नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भंडारा-गोंदियासाठी अजूनही म्हणावा तसा जोर कुणी लावलेला नाही. जेव्हा जागवाटपाच्या निर्णयाची बैठक होईल तेव्हाच काय ते ठरणार आहे. येत्या 15-20 दिवसांत आपसात बसून जागा वाटपाचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे. भाजप नक्कीच मोठा पक्ष आहे. त्यांचे २३ खासदार आहेत. त्यानुसार कोणाची कुठे ताकद आहे, हे बघून निर्णय घेतला जाणार आहे. भाजपला निवडणुकीची तयारी करण्याची गरज नाही. 365 दिवस भाजप इलेक्शन मोडवर असते.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीची जबाबदारी स्वीकारून नेतृत्व करावे, असा निर्णय आमदार, खासदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतला. लोकप्रतिनिधींनी बहुमताने निर्णय घेतला. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी अजित पवार आणि शिंदे सेनेचे प्रकरण वेगळे दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना अंतिम निर्णय द्यावा, असे सांगितले होते. आता अजित पवार आणि शरद पवार यांच्या बाबतीत पुढे काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.