Lok Sabha Election 2024 : ‘मोटाभाई की फटकार’ची अनेकांना धास्ती; वाढली ‘दिल की धडकन’

BJP in Vidarbha : पक्षातील गटबाज नेत्यांना होणार कानउघाडणी. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांना मिळणार ‘अल्टीमेटम’ अन्यथा परिणाम भोगण्याची ‘वॉर्निंग’
Amit Shah in Akola.
Amit Shah in Akola.Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत नीकटवर्तीय आणि भाजपचे चाणक्य अमित शाह अकोला येथे दौऱ्यावर येत आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा या लोकसभा मतदार संघाचा शाह आढावा घेणार आहेत. गुजरातीमध्ये मोठाभाऊ या अर्थाने संबोधल्या जाणाऱ्या ‘मोटाभाई’ अमित शाह यांची अकोला दौऱ्यात काही नेत्यांना चांगलीच फटकार बसणार आहे. ‘मोटाभाई की फटकार’ विदर्भातील भाजपच्या काही जिल्ह्यातील नेत्यांना आता काळाची गरज झाली आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि आतापर्यंत झालेल्या अनेक तक्रारींची शाह दखल घेणार असल्याचे संकेत भाजप प्रदेश पातळीवरील एका नेत्याने दिले. यापैकी काही नेत्यांना ‘कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे’ असा ‘अल्टीमेटम’ मिळणार आहे.

देशाच्या राजकारणात सध्या भाजप सर्वांत शक्तीशाली राजकीय पक्ष आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपमध्येही गटबाजीने डोके वर काढले आहे. एकमेकांच्या तक्रारी, गटबाजी, ज्येष्ठ नेत्यांचे न ऐकणे अशा अनेक तक्रारी आतापर्यंत प्रदेश पातळीपर्यंत मर्यादीत होत्या. मात्र ‘मोटाभाई’चा दौरा असल्याने सोनाराच्या हातूनच कान टोचून घेतलेले बरे असा विचार मनात ठेवत कदाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठरविले आहे. याची कुणकुण भाजपमधील काही नेत्यांना लागलीही आहे. त्यामुळे विदर्भातील बोटावर मोजण्याइतक्या काही नेत्यांची धास्ती वाढली आहे. गेल्यावेळी शाह यांचा दौरा स्थगित झाल्याने यापैकी काही नेत्यांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा या नेत्यांची ‘दिल की धडकन’ बिघडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah in Akola.
Amit Shah : आदित्य यांना मुख्यमंत्री करायचंय, म्हणून उद्धव ठाकरेंचा आटापीटा; अमित शाहांचे 'मातोश्री'वर प्रहार

अकोला शहरातच शाह यांची बैठक होत असल्याने येथील भाजपकडे यजमानपद आहे. त्यामुळे बैठक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी अकोला भाजपमधील सगळ्यांचीच कसरत सुरू आहे. शाह यांच्यासमोर अगदी अचूक ‘प्रेझेंटेशन’ झाले पाहिजे यासाठीच्या सूचना सर्वच मतदारसंघातील नेत्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या डोळ्याची झोप उडाली आहे. बैठकीमध्ये निमंत्रित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये अनेक नेते परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे ते शाह यांच्यासमोर एकमेकांबद्दल गोड बोलतील असे अपेक्षितही नाही. फरक तो एवढाच असणार आहे की, इतर पक्षातील नाराजीनाट्य तमाशाचे स्वरुप घेते व त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतात. भाजपमध्ये बऱ्यापैकी शिस्त असल्याने नाराजी व्यक्त करण्याची पद्धत अगदी ‘सोबर स्टाइल’ आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने यंदा ‘चारसौ पार’चे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे. अमित शाह हे विदर्भातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची, नेत्याची, पदाधिकाऱ्याची अगदी सूक्ष्मीतील सूक्ष्म माहिती घेऊनच बैठकीत येणार आहे. त्यामुळे जी व्यक्ती देश चालविणाऱ्या मोदींची चाणक्य म्हटली जाते त्यांना अजिबातच ‘लाइटली’ घेऊ नका असे नेत्यांना सांगण्यात आले आहे. अशात शाह यांच्यासमोर काय बोलायचे, किती बोलायचे व नेमके काय बोलायचे नाही याचा सल्ला देखील अनेकांना देण्यात आला आहे. असे असले तरी जी माहिती थेट शाह यांच्यापर्यंत पोहाचेली आहे, त्याची दखल घेत न ऐकणाऱ्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याचे कामही शाह करणार आहेत. त्यानंतरही न ऐकणाऱ्यांची योग्यवेळी ‘पावर’ कशी ‘कट’ होते व अशाच्या अति‘उर्जेचे’ ‘व्होल्टेज’ कसे जागेवर आणले जाते, याचे उदाहरण विदर्भाने पाहिले आहे, हे सर्वच नेत्यांना ध्यानात ठेवावे लागणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Amit Shah in Akola.
Amit Shah News : पवारांना त्यांच्या मुलीला अन् ठाकरेंना त्यांच्या मुलाला..! अमित शहांचा दिल्लीतून निशाणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com