काँग्रेसचं काळं कुत्रं जरी आलं तर..! भाजपच्या अनिल बोंडेंची थेट धमकी

काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आज राडा होण्याची शक्यता आहे.
Anil Bonde
Anil Bonde Sarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेत केलेल्या भाषणावरून काँग्रेसने (Congress) आक्रमक भूमिका घेतली आहे. मोदींनी महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटा आरोप केला असून, त्यांनी माफी मागावी यासाठी काँग्रेस आज राज्यभरातील भाजप (BJP) कार्यालयांसमोर निदर्शने करणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना कुत्र्याची उपमा दिली आहे. यावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आज राडा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज राज्यातील सगळ्या भाजपच्या कार्यालयांसमोर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी मोदींनी माफी मागावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, आता भाजप नेते व माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यावरून वाद पेटला आहे. बोंडे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांबद्दल बोलताना जीभ घसरली आहे. याआधी बोंडे यांनी अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये करून वाद ओढवून घेतला आहे.

Anil Bonde
भाजपचे 6 उमेदवार डेऱ्यात दाखल झाले अन् 24 तासांतच बाबा राम रहीम तुरुंगातून बाहेर

नाना पटोले व काँग्रेस कार्यकर्त्यांना बोंडे यांनी धमकी दिली आहे. त्यामुळे आज भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमधे राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोंडे यांनी ऑडियो क्लिपमध्ये म्हटले आहे की, खरे तर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची या काँग्रेसवाल्यांनीच माफी मागायला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रमध्ये कोरोनाच्या काळात ते कोणाच्याच कामाला आले नाहीत. मुख्यमंत्री आले नाहीत, नाना पटोले फिरकले नाही. लोकांना वाऱ्यावर सोडून दिले आणि गमजा करत बसले. उद्या काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर आले तर त्याला झोडल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाहीत.

Anil Bonde
काँग्रेसचा दे धक्का! 'या' राज्यात थेट भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले

नाना पटोले काय म्हणाले होते?

राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राबाबत थोडीफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची 'महाराष्ट्रद्रोही' म्हणून नोंद केली जाईल, अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. ते म्हणाले होते की, महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सत्तेतून दूर केल्यापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या सर्व नेत्यांना महाराष्ट्रद्वेषाची कावीळ झाली आहे. त्यामुळे ते दररोज महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी खोटीनाटी षडयंत्रे रचत आहेत. आता तर पंतप्रधानांनी महाराष्ट्र द्वेषाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचा असतो याचाही त्यांना विसर पडला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची गरिमा घालवली असून ते फक्त भाजपचे प्रचारक झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com