Bhandara : विधानसभा निवडणुकीला वर्षाचा अवधी; तरी फुके, पटोलेंनी फुंकले रणशिंग

BJP Vs Congress : दोन्ही नेत्यांचा मतदारसंघात वाढतोय व्यापक जनसंपर्क
Parinay Fuke & Nana Patole.
Parinay Fuke & Nana Patole.Google

Sakoli Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा अवधी असला तरी भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात दोन दिग्गज नेत्यांनी रणशिंग फुंकले आहे. या मतदारसंघात महाराष्ट्रातील काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भाजपलाही येथे विजय मिळवायचा आहे, त्यामुळं दोन्ही नेते आतापासूनच कामाला लागले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा गृहजिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघ आहे. पटोले यांना तगडी टक्कर देण्यासाठी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, माजी मंत्री डॉ. परिणय फुके मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे साकोलीतील दोन्ही नेत्यांच्या तयारीकडं आतापासून राज्याचं लक्ष लागलं आहे. (BJP Leader & Former Minister Parinay Fuke Will Give Strong Fight To Congress State President MLA Nana Patole in Sakoli Assembly Constituency Of Bhandara)

Parinay Fuke & Nana Patole.
Bhandara News : एकनाथ शिंदे विरोधाला न जुमानता काम करताहेत, अजितदादांनी केली पाठराखण

काँग्रेस आणि भाजपत साकोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. आमदार नाना पटोले यांचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. तर महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या लोकांपैकी डॉ. परिणय फुके हे एक आहेत. त्यामुळं साकोलीतील विधानसभा निवडणुकीनं राज्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.

साकोली मतदारसंघासाठी काँग्रेस किंवा भाजप यांच्यापैकी कुणीही अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. तरीही येथे पटोले विरुद्ध फुके असा सामना रंगण्याची दाट शक्यता दोन्ही पक्षातील नेत्यांकडून वर्तविली जात आहे. 2008 मध्ये विधानसभा मतदारसंघांचे परिसीमन झालं. नव्या रचनेनुसार आमदार पटोले यांचा तेव्हाचा लाखांदूर मतदारसंघ गोठविण्यात आला. लाखांदूरचा साकोली मतदारसंघात समावेश झाला. सध्या साकोली मतदारसंघात साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदारसंघाच्या परिसीमनामुळं कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, असा प्रश्न पटोले यांना पडला होता. अशात त्यांनी हिवाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर धानाच्या पेंढ्या जाळल्या व काँग्रेसचा ‘पंजा’ हातून झटकला व भाजपची कास धरली. 2014 मध्ये त्यांना भाजपनं भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून संधी दिली. पटोले खासदार झालेत. मात्र, पुन्हा शेतकऱ्यांच्या मुद्द्याचं कारण पुढे करत त्यांनी 2019 मध्ये भाजपविरोधात बंड केले आणि काँग्रेसला जवळ केलं. त्यानंतर त्यांनी साकोली विधानसभेची निवडणूक लढविली. त्यात त्यांचा विजय झाला.

पटोले यांनी अलीकडच्या काळात आयोजित बहुतांश मंडई कार्यक्रमाला उपस्थिती नोंदविली. अनेक विकासकामांचं लोकार्पणही त्यांनी केलं. मतदारसंघात असलेल्या विविध समाजातील प्रतिष्ठितांच्या भेटीही ते घेत आहेत. भंडाऱ्याला महापुराने तडाखा दिल्यानंतर पटोले अधिकाऱ्यांच्या पथकांसह पंचनाम्यांसाठी स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचं नेतृत्वही त्यांनी केलं. ग्रामीण भागातील पकड घट्ट राहावी, यासाठी त्यांनी पंचायत समितीस्तरावर बैठकीही घेणं सुरू केलं आहे. विरोधी पक्षात नाराज असलेल्या महत्त्वाच्या लोकांशीही त्यांनी जवळीक साधली आहे.

Parinay Fuke & Nana Patole.
Bhandara News : अपात्र ठरविलेल्या महिलेला प्रमाणपत्र देत शासन पोहोचले दारी

डॉ. परिणय फुके यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांचा भंडारा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. एमबीए आणि त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पी.एचडी. प्राप्त करणाऱ्या डॉ. फुके यांनी 2007 मध्ये नागपूर महापालिका निवडणुकीत विजय प्राप्त केला होता. नागपूर भाजपचे ते उपाध्यक्षही होते. 2016 पासून ते भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे विधान परिषद आमदार होते. आपल्या ‘मॅनेजमेंट स्किल्स’चा ते राजकारण व

समाजकारणातही पूरेपूर वापर करीत असतात. डॉ. फुके यांनी सध्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी काम सुरू केले आहे. कार्यकर्त्यांच्या भेटी ते घेत आहेत. याशिवाय अलीकडेच त्यांनी दिवाळी मिलनाचं मोठं आयोजनही केलं. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते प्रशासकीय पातळीवरही ‘फ्रंटफूट’वर आले आहेत. ग्रामीण भागातील संपर्कात वाढ व्हावी, यासाठी डॉ. फुकेही मंडईच्या आयोजनांमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळं आगामी काळात ते साकोली विधानसभेची निवडणूक लढवतील, असे निश्चित मानले जात आहे. तसे झाल्यास पटोले विरुद्ध फुके हाच सामना रंजक ठरणार आहे.

Edited by : Atul Mehere

Parinay Fuke & Nana Patole.
Parinay Fuke : गोवारी समाजावरून परिणय फुकेंचा महाविकास आघाडीवर घणाघात; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com