Weird Incident : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भंडारा येथे झालेल्या कार्यक्रमातून प्रशासन भलत्याच्याच दारी पोहोचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तहसीलदारानं नामंजूर केलेल्या एका प्रकरणाचं लाभार्थी प्रमाणपत्र संबंधित महिलेला या तीनही नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या शिबिरात देण्यात आलं आहे.
प्रशासनाच्या या चुकीमुळं तहसीलदार चुकले होते, की प्रमाणपत्र देणारी यंत्रणा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भंडारा प्रशासनात चर्चेला ऊत आला आहे. (In a Weird Incident Bhandara Administration Issued Beneficiary Certificate To Ineligible Declared Women During Shasan Aaplya Dari Camp)
तुमसर तालुक्यातील ढोरवाडा येथील सुग्रता चांगो कुकडे नामक एका वृद्ध महिलेने श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभ मिळावा, यासाठी अर्ज केला होता. तुमसर तहसील कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला होता. निवड समितीने 20 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत महिलेचे उत्पन्न जास्त असल्याच्या कारणावरून अर्ज नामंजूर केला होता. तसे पत्रही तलाठ्याच्या मार्फत कुकडे यांना पाठविण्यात आले होते. अर्ज नामंजूर झाल्याच्या दु:खात ही निराधार महिला भंडारा येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात 20 नोव्हेंबरला पोहोचली.
कार्यक्रमाला गर्दी झाली पाहिजे म्हणून काही लोक आपल्याकडे आले होते. त्यांनी आपल्याला शिबिराच्या ठिकाणी आणल्याच कुकडे यांनी सांगितलं. एका मांडवात शिबिरातील मान्यवरांची भाषणं सुरू असताना सुग्रता चांगो कुकडे यांना दुसऱ्या मांडवात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी थेट श्रावणबाळ योजनेचे लाभ प्रदान करण्यात येत असल्याचे प्रमाणपत्रच देऊन टाकले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नामंजूर झालेल्या प्रकारात लाभार्थी प्रमाणपत्र मिळाल्यानं या निराधार महिलेला आता सुखद धक्का बसला आहे. परंतु तहसीलमधून आपल्याला अपात्र जाहीर केल्यानंतर दुसऱ्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी केल्यानं ही महिलाही संभ्रमात पडली आहे. नामंजूर प्रकरण नेमके मंजूर कसे झाले कसे, असा प्रश्न कुकडे यांना पडला आहे. दुसऱ्या लाभार्थ्यांचा घरी जाता जाता शासन वाट चुकल्यानं तर कुकडे यांच्या दारी गेला नाही ना, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
‘शासन आपल्या दारी’ आयोजनात कोणत्याही कारणांमुळं का होईना सुग्रता चांगो कुकडे यांना श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी प्रमाणपत्र आता मिळाले आहे. सुग्रता या वयोवृद्ध आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या चुकीची शिक्षा आता शासन, प्रशासनाने त्यांना देऊ नये व त्यांचं नाव आता लाभार्थ्यांच्या यादीतून काढण्यात येऊ नये, अशी मागणी ढोरवाडा येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.