
Bhandara district bank BJP news : गोंदिया आणि चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक जिंकल्यानंतर आता महायुतीने भंडारा जिल्हा बँक जिंकण्याची जोरदार तयारी केली आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीतून माघार घेऊन आधीच नांगी टाकली असली, तरी भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी बँकेचे माजी अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या विरोधात आपली दावेदारी कायम ठेवली आहे.
बँकेच्या एकूण 21 संचालकांसाठी आज रविवारी (ता. 27) मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी सोमवारी (ता. 28) होणार आहे. ही निवडणूक नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी वर्चस्वाची लढाई आहे.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी, भाजप (BJP) आणि शिवसेने सोबत आहेत. भंडारा दूध संघाच्या निवडणुकीत नाना पटोले यांच्यासोबत गेलेले भंडाराचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर महायुतीत पुन्हा परतले आहेत. महायुतीने गोंदिया बँक आणि भंडार दूध संघाच्या निवडणुकीत नाना पटोले यांना आधीच पराभूत केले आहे.
यानंतर नाना पटोले यांनी भंडारा जिल्हा बँकेची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला होता. भंडारा बँक वाचवण्यासाठी आपण लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेताना त्यांनी कुठलेच कारण दिले नाही. त्यांचे कट्टर समर्थक खासदार पडोळे मात्र निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.
कैलाश नशीने, धर्मराव भलावी, सुनील फुंडे, प्रकाश मालगावे, प्रशांत पवार, प्रदीप पडोले, संदीप फुंडे, चेतक डोंगरे, योगेश हेडाऊ, आशा गायधाने, टीरा तुमसरे, माजी आमदार नाना पंचबुधे, कवलजीतसिंह चड्ढा, विश्वनाथ कारेमोरे, होमराज कपगते, रामदयाल पारधी, अनिल सर्वे, सदानंद बर्डे, जितेश इखर, धर्मेंद्र बोरकर, श्रीकांत वैरागडे निवडणूक लढत आहेत.
खासदार प्रशांत पडोळे, चंद्रदीन अराम, अजय मोहनकर, अरविंद असाई, नरेंद्र वाघाये, बाळकृष्ण सर्वे, सतीश टिचकुले, शशिकिशोर बांडाबुचे, धनंजय तिरपुडे, सदाशिव वलथरे, संजय केवट, शीला अगासे, सविता ब्राह्मणकर, रसिका भुरे, चंद्रकांत निंबार्ते, विवेक पडोले, शशांत जोशी, किरण अतकरी, रेखाबाई समरित, चंपालाल कटरे, रामलाल चौधरी, प्रदीप बुराडे, मोहित मोहरकर, अशोक चोले यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.