Nilesh Lanke On Kiran Kale rape case : किरण काळेंविरुद्ध '376'चा गुन्हा कोणाच्यातरी सांगण्यावरून; खासदार लंकेंना पोलिसांच्या कारभारावर शंका

NCP MP Nilesh Lanke Demands Fair Probe in Shivsena Thackeray Kiran Kale Rape Case Ahilyanagar News : शिवसेना ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळेंविरुद्ध दाखल गुन्ह्यात खासदार नीलेश लंकेंनी निवेदन देत सखोल तपासाची मागणी केली.
Nilesh Lanke On Kiran Kale
Nilesh Lanke On Kiran KaleSarkarnama
Published on
Updated on

Kiran Kale rape FIR investigation : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांच्याविरोधात दाखल अत्याचाराच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके मैदानात उतरले आहे.

दिल्ली इथल्या अधिवेशनाच्या धावपळीत देखील त्यांनी अहिल्यानगरला येत अतिरीक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची भेट घेत निवेदन दिले. दाखल करण्याची जिल्हाबाहेर पोलिस यंत्रणेमार्फत सखोल आणि नि:पक्षपाती तपास व्हावी, अशी मागणी केली. याचबरोबर त्यांनी या गुन्ह्यामागे पोलिस यंत्रणेचा राजकीय वापर होत असल्याचे मोठा संशय व्यक्त केला.

अप्पर पोलिस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर खासदार लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "शिवसेनेचे (Shivsena) किरण काळे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा तांत्रिक स्वरूपाचा आहे. त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने तो दाखल झाला आहे. या गुन्ह्याची नि:पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे".

'हा गुन्हा कोणाच्यातरी सांगण्यावरून दाखल करण्यात आला असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीवरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी केल्याची माहिती खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी दिली.

Nilesh Lanke On Kiran Kale
Walmik Karad NCP : वाल्मिक अजूनही झळकतोय बॅनरवर; यामागे अजितदादांचे पदाधिकारी, धनंजय देशमुखांनी दिले पुरावे

अहिल्यानगर शहरात आतापर्यंत अनेक वेळा, अशा प्रकारची तांत्रिक गुन्हे दाखल झाले आहेत. यापूर्वी दिवंगत माजी आमदार अनिलभैय्या राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक विक्रम राठोड व योगीराज गाडे यांच्याविरोधात देखील असेच तांत्रिक गुन्हे दाखल करून पोलिस दलाचा गैरवापर करण्यात येत आल्याचा गंभीर आरोप खासदार लंके यांनी केला.

Nilesh Lanke On Kiran Kale
कोकण रेल्वेची भन्नाट सेवा, परफेक्ट कॉम्बो! गणेशोत्सवासाठी ‘कार ऑन ट्रेन’ सुविधा

खासदार लंके यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह अप्पर पोलिस अधीक्षकांची शनिवारी भेट घेऊन काळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठामपणे सांगितले. दरम्यान निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, किरण काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, नुकतेच त्यांनी अहिल्यानगर महापालिकेतील तब्बल 350 ते 400 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश प्रसारमाध्यमांसमोर केला होता. या आरोपानंतर काही दिवसानंतरच 21 जुलैला कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

खासदार लंके यांनी, ही घटना ही राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हा दाखल होऊनही अद्यापपर्यंत कोणताही सखोल तपास झालेला नाही. हे विशेष चिंतेचे असून, पोलिस यंत्रणेवर राजकीय दबाव असल्याचे संकेत मिळत आहेत, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

"पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल करताना व तपासाच्या प्रक्रियेत तटस्थता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. गुन्ह्याचा योग्य तपास होऊन सत्य बाहेर येणे हाच न्यायप्रक्रियेचा गाभा आहे," असे स्पष्ट करत लंके यांनी हा गुन्हा जिल्हा पातळीबाहेरील स्वतंत्र पोलीस यंत्रणेकडे सोपवण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली.

ते पुढे म्हणाले की, “कोणावरही अन्याय होऊ नये, आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हा लोकशाहीतील मूलभूत सिद्धांत आहे. न्यायाच्या दृष्टीने पारदर्शक आणि निष्पक्ष तपास ही काळाची गरज आहे.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com