BJP Ganesh Naik warning : शिंदेंच्या शिवसेनेची भाजप मंत्र्यांविरोधात न्यायालयात धाव; गणेश नाईकांचा, 'दम है तो रोक के बताओ'चा इशारा

Eknath Shinde Thane Janata Darbar Faces Subtle Warning from Navi Mumbai BJP Minister Ganesh Naik : भाजप मंत्री गणेश नाईक घेत असलेल्या जनता दरबारावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.
BJP Ganesh Naik
BJP Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai BJP politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे मुंबई आणि नवी मुंबईत महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात दिवसेंदिवस राजकीय संघर्ष वाढू लागला आहे. मंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथं बालेकिल्ल्यात भाजपने जनता दरबार घेत सुरूवात केली.

भाजपच्या या रणनीतीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जशास-तसं उत्तर देण्यात सुरूवात केली आहे. मात्र मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार सुरू राहणार असल्याचे सूचक विधान केले आहे. त्यामुळे भाजप-एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आता हा राजकीय संघर्ष आगामी काळात अधिकच उफळणार असल्याचे चित्र आहे.

मंत्री गणेश नाईक म्हणाले, "जनतेच्या समस्या सोडविणे, हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. त्यासाठी जनता दरबार हा उत्तम पर्याय असून, राज्यातच नव्हे तर देशात आपल्याइतके जनता दरबार कोणीच भरविलेले नसतील. मंत्रीच नव्हे तर आमदार, खासदारही जनता दरबार भरवून सामान्यांच्या समस्या सोडवू शकतात." यामुळे कोणी कितीही विरोध केला तरी, आपला जनता दरबार थांबणार नाही, अशी स्पष्टोक्ती भाजप (BJP) मंत्री गणेश नाईक यांनी केली.

वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थित जनता दरबार झाला. मंत्री गणेश नाईक यांनी चावलेल्या जनता दरबारामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे बेलापूर जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी मंत्री नाईकांच्या जनता दरबारमुळे महापालिका, सिडको, पोलिस अधिकाऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होत असल्याचे सांगून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

BJP Ganesh Naik
Maratha Kunbi certificate issue : अजितदादांच्या हस्ते वाटप झालेले प्रमाणपत्र कुणबी नाहीच; जरांगेंकडून पडताळणी सुरू, सरकार अन् प्रशासनात गोंधळ!

मंत्री नाईक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री नाईक म्हणाले, "जनता दरबारातून सामान्यांच्या अनेक समस्या मार्गी लागत आहेत. नवी मुंबई, ठाणेसारख्या शहरी भागात 70 टक्के, तर पालघरसारख्या आदिवासीबहुल भागात 80 टक्के समस्या जनता दरबारातून सुटतात. यामुळे जनता दरबारामुळे अधिकाऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होतो, असे म्हणणे चुकीचे आहे."

BJP Ganesh Naik
BJP ShivsenaUBT alliance claim : उद्धवसेनेची भाजपला मदत? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता, महायुतीमधील समन्वय कोलमडलं!

...तरच जनता दरबार बंद!

मंत्री नाईक अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले. "काही नालायक अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेची कामे मार्गी लागत नाहीत. ते नीट वागले तर, समस्या राहणारच नाहीत. अधिकाऱ्यांनी कर्तव्यपूरक कामे केली तर, जनता दरबार घेण्याची गरजच भासणार नाही. ज्या दिवशी या समस्या सुटतील, त्या दिवशी जनता दरबार बंद करू," असे मंत्री नाईक यांनी म्हटले.

भाजप-शिवसेनेमध्ये राडा

दरम्यान, कल्याणमधील शहाड रेल्वे स्थानक परिसरात नवरात्रौत्सवाचा शुभेच्छा फलकावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष मोहन कोणकर आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट यांच्यात वाद झाला. या राड्यात मोहन, मुकेश तसेच अन्य एकजण जखमी झाले.

गुन्हा दाखल

एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश हा आपल्या कार्यकर्त्यांसह नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा फलकाचा बॅनर लावण्यासाठी गेला होता. त्यावेळी भाजप विभाग अध्यक्ष मोहन कोणकर याने फलक लावण्यास विरोध केला. ही भाजपने लावलेली लाकडी चौकट आहे. याठिकाणी तुम्ही फलक लावू नका, असे म्हणाले. मुकेशने त्याच्या वडिलांना घटनास्थळी बोलावून घेतले. यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. खडकपाडा पोलिस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी देण्यात आल्या. तक्रारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com