MLA Govardhan Sharma Passed Away : सच्चा स्वयंसेवक आणि विदर्भवादी नेता हरपला, आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन

BJP Akola Political News : भाजपसह अकोलेकरांमध्ये शोककळा....
MLA Govardhan Sharma
MLA Govardhan SharmaSarkarnama
Published on
Updated on

Akola Political News : अकोलेकरांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, सदैव मदतीचा हात देणारे, सामान्यांमध्ये ‘लालाजी’ नावाने प्रसिद्ध अकोला पश्चिमचे भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचं शुक्रवारी (ता. 3) निधन झालं. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्यानं कार्यरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि रामभक्त अशी त्यांची ओळख होती.

पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. लोकनेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर, प्रमिलाताई टोपले, वसंतराव देशमुख, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून आमदार शर्मा यांची ओळख होती.

MLA Govardhan Sharma
Nilesh Lanke News : हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा देणाऱ्या आमदार लंकेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...

अकोलेकरांवर कोणतंही संकट ओढवलं तरी धाऊन जाणारे व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. डाबकी मार्गावरील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.(BJP)

अकोल्यातील श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं सामाजिक कार्यात सहभाग घेतला. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणुनही त्यांनी काम केलं होतं. पत्नी गंगादेवी शर्मा, दोन मुलं, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार त्यांच्या पश्चात आहे. रामदेव बाबा, शामराव मंदिर, सालासर हनुमान मंदिराचे विश्वस्त म्हणुनही त्यांनी काम पाहिलं. पश्चिम विदर्भातील सर्वशाखीय ब्राह्मण समाजाला त्यांनी एकत्रित करण्याचं कामही केलं. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे अमूल्य योगदान होतं.

मोबाईल न वापरणारे आमदार....

अत्यंत धार्मिक वृत्तीचे आमदार म्हणुन सर्वांना परिचित असणारे ‘लालाजी’ यांचं वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल न वापरणारा नेता असं अकोल्यात होतं. मोबाईल किंवा डायरी सोबत नसतानाही अनेकांचे संपर्क क्रमांक आमदार शर्मा यांना तोंडपाठ होते. कार्यकर्ते किंवा ओळखीच्या मंडळींच्या दुचाकीवर डबलसिट बसून जाणारे लालाजी पाठिमागील सिटवर बसले की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्याचं ऊर भरून यायचं. पांढरा कुर्ता-पायजामा हा त्यांचा ठरलेला पहेराव होता.

रामजन्मभूमी आंदोलनात सहभाग

आमदार गोवर्धन शर्मा यांचा श्रीराम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग होता. १९८५ मध्ये झालेल्या शीलापूजनातही त्यांचा समावेश होता.

घराघरात पोहोचलेली व्यक्ती

अकोल्यातील जनाजनाच्या मनामनात पोहोचलेली व्यक्ती म्हणुन आमदार गोवर्धन शर्मा यांची ख्याती होती. अगदी अकोल्यात नगरपरिषद परिषद अस्तित्वात असतानापासून राजकारणात सक्रिय असलेल्या आमदार शर्मा यांनी शहराच्या कानाकोपऱ्यात आपला दांडगा जनसंपर्क निर्माण केला होता. कोणताही सुख-दु:खाचा प्रसंग असो, लालाजी येऊन गेले नाहीत, असं अकोल्यात शक्यच नव्हतं.

MLA Govardhan Sharma
Nilesh Lanke News : हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा देणाऱ्या आमदार लंकेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...

भाजपसाठी अकोला हा मतदारसंघ कायम अनुकूल मानला जातो. याच मतदारसंघात गोवर्धन शर्मा ( Govardhan Sharma) यांनी मागील 25 वर्षांत भारतीय जनता पार्टीचा दबदबा निर्माण केला होता. शर्मा यांनी 2014 मधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नसतानाच मोठ्या मताधिक्यासह विजय खेचून आणला होता. अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपची तटबंदी फार मजबूत असल्याचे कायम पाहायला मिळाले आहे.याच मतदारसंघात गोवर्धन शर्मा यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते.

2014 मधील विधानसभेच्या निवडणुकीत आमदार गोवर्धन शर्मा यांना 66 हजार 934 मते मिळाली होती. तर 2019 ला शर्मा यांना 70 हजार 291 मते प्राप्त झाली.पक्षाचे तगडे नेटवर्क आणि संकटसमयी मतदारांनी तारल्याची बाब गोवर्धन शर्मा यांच्या पथ्यावर पडल्याचे निकालाअंती समोर आले होते.

MLA Govardhan Sharma
EXPLAINER : मराठा आरक्षण लढ्यात ट्रेंडिंग शब्द ठरणारा 'क्युरेटिव्ह पिटिशन' आहे तरी काय ?

सलग सहाव्यांदा गोवर्धन शर्मा विजयी झाले असले तरी काँग्रेसने दिलेली निकराची लढाई अकोलेकरांच्या कायम स्मरणात राहील अशी चर्चा देखील रंगली होती.

(Edited By : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com