Nilesh Lanke News : हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा देणाऱ्या आमदार लंकेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...

Drought in Nagar District : जाणून घ्या, मराठा आरक्षणानंतर आता कोणता मुद्दा आमदार लंके यांनी उचलला आहे?
MLA Nilesh Lanke
MLA Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

MLA Lanke letter to CM Shinde : मराठा आरक्षण मिळाले नाही, तर हिवाळी अधिवेशन बंद पाडू, असा इशारा देणारे आणि मंत्रालयास टाळे ठोकणाऱ्या आमदार नीलेश लंके यांनी आता नगर जिल्ह्यातील दुष्काळावरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. निकषात बसत असूनदेखील नगर जिल्हा दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा आरोप आमदार लंके यांनी या पत्राद्वारे केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Nilesh Lanke
Tanpure Vs Kardile : ''100 कोटी थकवलेल्यांनी बोलू नये''; कर्डिलेंचा तनपुरेंवर पलटवार!

आमदार नीलेश लंके यांनी पत्रात म्हटले आहे की, "नगर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाला आहे. पावसात मोठा खंड पडला होता. दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व निकषात असतानादेखील सर्वेक्षणासाठी नेमलेल्या कंपनीने चुकीचे सर्वेक्षण केले आहे. यामुळे नगर जिल्ह्याचा दुष्काळी यादीत समावेश झालेला नाही.

पर्यायाने नगर जिल्हा सरकारच्या दुष्काळी काळातील उपाययोजनांपासून वंचित राहणार आहे". तसेच, नगर दक्षिण भागात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. याची आकडेवारी आमदार लंके यांनी दिलेल्या पत्रात नमूद केली आहे.

याचबरोबर, दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी दुष्काळाच्या निकषानुसार कार्यवाही झाली पाहिजे. परंतु नगर जिल्ह्याबाबत अशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रत्यक्ष स्थिती व कागदोपत्री आकडेवारीमध्ये मोठी तफावत आहे. नगर जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे.

राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने घोषित केलेल्या ट्रिगर एक आणि दोनच्या निकषात नगर जिल्हा बसतो. तरीदेखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नगर जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचा आरोप आमदार लंके यांनी केला आहे.

MLA Nilesh Lanke
Maratha Reservation : ''राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू'', मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती!

याशिवाय, ''केंद्र सरकारच्या दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2006 नुसार दुष्काळाचे मूल्यांकन करण्याची कार्यवाही जिल्हास्तरीय समितीची आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असल्याने त्यांनीच मूल्यांकन करावे. तसेच कागदोपत्री आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती यात तफावत आहे.

त्यामुळे मदत आणि पुनर्वसन मंत्रीच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने नगर जिल्ह्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी लवकर निर्णय घ्यावा.'' अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com