Parinay Phuke : परिणय फुकेंनी वडेट्टीवारांना पकडले कात्रीत; म्हणाले, मंत्री असताना ओबीसींसाठी काय केले?

Parinay Phuke on Vijay Wadettiwar : ओबीसींसाठी काय केले अशी विचारणा करून भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुके यांनी त्यांचे काहीच योगदान नसल्याचा आरोप केला.
Parinay Phuke Vijay Wadettiwar
Parinay Phuke Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार महायुतीच्या नेत्यांवर रोज टीका करतात. भ्रष्टाचाराचे आरोप करतात. मात्र दोन वर्षे मंत्री असताना त्यांनी ओबीसींसाठी काय केले हे सांगत नाहीत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किती हॉस्टेल बांधले अशी विचारणा करून भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुके यांनी त्यांचे काहीच योगदान नसल्याचा आरोप केला.

ओबीसींच्या मागण्या पूर्ण केल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले आहे. ‘बहुजन हितासाठी मी दे भाऊंच्या पाठी‘ या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जाहिरातीने मोठा वाद पेटला आहे. काँग्रेसचे नेते महासंघावर चांगलेच नाराज आहे. जाहिरातींच्या माध्यमातून ओबीसींची भाजप दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत आहे. या आरोपावर परिणय फुके यांनी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) मंत्री असताना काहीच ठोस काम केले नसल्याचा आरोप केला.

Parinay Phuke Vijay Wadettiwar
Congress OBC Strategy : 'ओबीसीं'ची धास्ती, काँग्रेस खेळणार 'हे' कार्ड

घोषणा केल्या आणि फक्त जीआर काढले म्हणून मंत्र्यांची जबाबदारी संपत नाही. त्याची अंलबजावणी करावी लागते. ती देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवली. त्यामुळेच महासंघाने त्यांचे आभार मानले आहे. राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघ राजकीय नाही. असे असताना काँग्रेस नेत्यांचा पोटात का दुखत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले असतानाही वडेट्टीवार यांनी काही ठोस भूमिका घेतली नाही, असेही फुके म्हणाले.

Parinay Phuke Vijay Wadettiwar
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे बडे नेते उतरणार विधानसभेच्या मैदानात

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे खरे ओबीसी नेते आहेत. त्यांनी दोन वर्षांच्या कार्यकाळात ओबीसींसाठई 48 जीआर काढले. त्याची अंमलबजावणीसुद्धा केली. ओबीसी समाज हा भाजपचा मतदार आहे. फडणवीस यांनी क्रिमिलियर मर्यादा वाढणार आहे.

वसतिगृहांचा विषय निकाल लावला याकडे फुके यांनी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात झालेल्या कुणबी समाजाच्या मेळाव्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह परिणय फुके हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी धानोरकरांच्या विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तन करा या वक्तव्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. श्याम मानव, विश्वंभर चौधरी शरद पवारांचे पोसलेले आहेत.

पैसे घेऊन ते भाजपच्या विरोधात बोलतात. देवी देवतांचा अपमान करतात. यावेळी त्यांनी ज्यांनी 30 वर्षे आमदार असताना मतदारांशी संवाद साधला नाही ते आता संवाद यात्रा काढत असल्याचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com