BJP Vs Congress : दम असेल तर संघ मुख्यालयाच्या कुलुपाला हात लावून दाखवा! भाजप आमदाराचे खुले आव्हान

Sandeep Joshi Harshvardhan Sakpal : भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी तुमच्यात दम असेल तर संघ मुख्यालयाच्या कुलपाला हात लावून दाखवा असे खुले आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांना दिले आहे.
Harshavardhan Sakpal, Sandeep joshi
Harshavardhan Sakpal, Sandeep joshiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : काँग्रेसच्या सद्‍भावना यात्रेनंतर पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये राजकीय दंगल सुरू झाली आहे. काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवला होता. गरज भासल्यास आम्ही संघ मुख्यालयाचे कुलूप फोडू, असा इशारा सद्‍भावना यात्रेच्या कार्यक्रमात दिला होता.

भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी तुमच्यात दम असेल तर संघ मुख्यालयाच्या कुलपाला हात लावून दाखवा असे खुले आव्हान दिले आहे. सोबतच आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत असे सांगून काँग्रेसला इशाराही दिला. औरंजगेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने आंदोलन केले होते. या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागले. एका जमावाने तुफान दगडफेक केली आणि गाड्यांची जाळपोळ केली.

Harshavardhan Sakpal, Sandeep joshi
Rahul Narwekar : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर घेतली हरकत; विधानभवनाच्या विस्तारावरून 2 विभागात वाद

दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महाल परिसरात कर्फ्यु लावण्यात आला होता. दंगेखोरांनी पोलिसांवरदेखील दगडफेक केली होती. काही पोलिसांना मारझोड केली. मुख्य आरोप फहीम खान याला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. अनेक मुस्लिमांना ताब्यात घेतल्यानंतर या वादाला हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग आला. काँग्रेसने फक्त मुस्लिम समाजालाचा टार्गेट केले जात असल्याचे सांगून या रंगाला आणखीच गडद केले.

दोन धर्मामध्ये निर्माण झालेली कटुतू दूर करण्यासाठी काँग्रेसने सद्‍भवना यात्रा काढली. या यात्रेत काँग्रेसच्या नेत्यांनी घणाघाती भाषण केले. रमेश चेन्निथाला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला. हर्षवर्धन सपकाळ यांनी दंगली घडवणे भाजप आणि संघाचा अजेंडा असल्याचा आरोप केला. औरंगजेबासोबत संघाने मदत केलेल्या ब्रिटिशांच्याही खबरी खणून काढणार का असा सवाल केला.

Harshavardhan Sakpal, Sandeep joshi
Kirit Somaiya News : किरीट सोमय्या झाडाझडतीसाठी नागपूर महापालिकेत; बांगलादेशींच्या बोगस दाखल्यांबाबत धक्कादायक माहिती समोर

जातीयवादाच्या याविरोधात लढा देण्यासाठी प्रसंगी संघाच्या मुख्यालयाचे कुलूप तोडू, असा इशारा सपकाळांनी दिला होता. त्यामुळे भाजपचे नेते चांगलेच संतापले. आमदार संदीप जोशी यांनीही त्यांना जशास तसे उत्तर दिले. तुमच्यात दम असेलल तर संघ मुख्यालयात येऊन दाखवा, कुलुपाला हाल लावून दाखवा. आम्ही हातात बांगड्या घालून बसलो नाही, अशा शब्दांत त्यांनी सपकाळांना सुनावले. नागपूरची दंगल अवघ्या चार तासांत आटोक्यात आली. ती कोणी घडवली आम्हाला ठाऊक आहे, असे सांगून जोशी यांनी कोणाचे नाव न घेता काँग्रेसच्या काही नेत्यांकडे शंकेचे सुई वळवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com