Pravin Datke : काँग्रेसच्या सद्‍भवाना यात्रेची भाजपने उठवली खिल्ली, आमदार दटके म्हणाले, 'मगरमच्छके आसू..'

Congress Sadbhavana Yatra 2025 : नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीला भाजपला जबाबदार ठरवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना आमदार प्रवीण दटके यांनी जशास तसे उत्तर दिले.
Pravin Datke
Pravin DatkeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीला भाजपला जबाबदार ठरवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना आमदार प्रवीण दटके यांनी जशास तसे उत्तर दिले. सद्‍भावना रॅली काढून राजकीय पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसचे नेते करीत आहे. फक्त पाचशे पावले चालून कोटींचे नुकसान झालेल्या माणसाचे दुःख कळणार का असा सवाल करून त्यांनी सद्‍भवाना यात्रा म्हणजे मगरमच्छके आसू अशी जोरदार टीका केली.

औरंगजेबाची कबर हटवण्याकरिता नागपूरात करण्यात आलेल्या आंदोलनाचा आधार घेऊन शहरातील काही समाजकंटकांकडून तरुणांची माथी भडकवण्यात आली. या दंगेखोरांमुळे शांत असणार्‍या नागपूरात दंगलीची दुर्दैवी घटना घडली. ही घटना घडल्यानंतर तातडीने शांतता प्रस्थापित करण्याची गरज असताना काँग्रेसचा एकही नेता त्यावेळी पुढे आला नाही. आज दंगलीला एक महिना पूर्ण होत असताना काँग्रेसला जाग आली आहे.

Pravin Datke
Sudhir mungantivar : मुनगंटीवारांसह 'या' तीन आमदारांना कोर्टाने बजावला समन्स; काय आहे नेमके कारण?

सद्भावना रॅली काढून राजकीय पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसचे नेते करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दटके (Pravin Datke) यांनी केला. यावेळी त्यांनी फक्त पाचशे पावले चालून कोटींचे नुकसान झालेल्या माणसाचे दुःख कळणार का असा सवाल करून काँग्रेसची सद्‍भवाना यात्रा म्हणजे मगरमच्छके आसू अशी जोरदार टीका केली.

काँग्रेसच्यावतीने आज सद्‍भावना यात्रा काढून नागपूरमध्ये उसळेलल्या दंगलीस भाजपचे नेते जबाबदार असल्याचा आरोप केला. यास दटके यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, या दंगलीमध्ये ज्या सामान्य नागरिकांच्या वाहनांचे, दुकानांचे आणि घरांचे कोट्यावधीचे नुकसान झाले, त्यांच्याबद्दल एकही शब्द काँग्रेस (Congress) नेत्यांनी व्यक्त केला नाही.

Pravin Datke
Harshvardhan Sapkal On Fadnavis : 'महाबली' फडणवीसांचा त्यांच्या मित्रपक्षांवरच विश्वास नाही..? हर्षवर्धन सपकाळांनी थेट मुद्द्यालाच हात घातला

आज झोपेतून जागे होऊन त्यांनी सद्भावना रॅली काढण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे मगरमच्छ के आसू असल्याचे नागपूरकरांना आता कळले आहे. काँग्रेस नेत्यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने दंगेखोरांवर बुलडोझरने कारवाई केली आहे. दंगलखोरांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर मिळणार असा इशाराही यावेळी दटके यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com