Amravati Misconduct Case : गर्भवतीला दात तुटेपर्यंत मारहाण, महिलांशी अश्लील वर्तन; मुस्लिम युवकांच्या दादागिरीविरोधात भाजप खासदार आक्रमक

Khatik and Sattur organizations submit memorandum to SP under BJP MP Anil Bonde leadership demanding strict action : अमरावती खोलापूर इथं महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्या मुस्लिम युवकांवर कारवाईसाठी भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलं.
Amravati Misconduct Case
Amravati Misconduct CaseSarkarnama
Published on
Updated on

Amravati crime news : अमरावतीच्या परतवाडा अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ अन् फोटो व्हायरल होण्याचा प्रकरण राज्यात गाजलं. पुढे हे प्रकरण अल्पसंख्याक समाजाच्या अल्पवयीन मुलींशी निगडीत असल्याचं समोर आलं.

आता पुन्हा मुस्लिम युवकांनी दहशत करत, महिलांशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या महिलांमध्ये असलेल्या गर्भवतीला जबर मारहाण केली. यात तिचा दात तुटला असून, ती गंभीर जखमी झाली आहे. मुस्लिम युवकांच्या या दादागिरीविरोधात भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक झाले आहेत.

अमरावतीच्या (Amravati) खोलापूर इथं चार मुस्लिम युवकांनी, शतपावली करत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीमधील महिलांची छेड काढली. या महिलांनी विरोध केल्यावरून, हे युवक अधिकच आक्रमक झाले अन् महिलांशी गैरवर्तन करू लागले. यातून वाद वाढला, मारहाण सुरू झाली.

वाद वाढवून, या चार मुस्लिम (Muslim) युवकांनी, महिलांशी गैरवर्तन केले. पुढे वाद वाढून, या युवकांनी त्या महिलांना जबर मारहाण केली. यात एक महिला गर्भवती होती. तिला देखील या युवकांना बेदम मारहाण केली. यात तिचा तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यात तिचा दात देखील तुटला आहे.

Amravati Misconduct Case
Obscene Video Viral Case : अमरावती हादरली! मुस्लिम युवकांकडून 180 युवतींचं लैगिंक शोषण, 350 व्हिडिओ व्हायरल, भाजप खासदाराची थेट अधीक्षकांकडे तक्रार

या घटनेची दखल घेत, पोलिसांनी कारवाई केली. अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करत, या दहशत निर्माण करणाऱ्या युवकांना अटक केली आहे. परंतु महिलांशी गैरवर्तन करणारे, हे युवक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. याबाबत खाटीक आणि सत्तूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप खासदार अनिल बोंडे यांची भेट घेत, माहिती दिली. यावर खासदार बोंडे यांनी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत, पोलिस अधीक्षकांची भेट घेत निवेदन दिले.

Amravati Misconduct Case
Paratwada Viral Video: अमरावती लैगिंक शोषण घटनेचे पडसाद; बाजारपेठ बंद, 'AIMIM'चा खुलासा, तर आरोपीच्या घराला 'बुलडोझर' लावण्याची तयारी?

खासदार बोंडे यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर गंभीर आरोप केले. अमरावतीमधील खोलापूर, शिरसगाव, करसगाव इथं मुस्लिमांची दादागिरी खूप वाढली आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या मुली त्यांनी टार्गेटवर ठेवल्या आहेत. खोलापूरमधील अवैध धंद्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केल्याचे खासदार बोंडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com