Yavatmal-Washim BJP Lok Sabha Elections Chief News: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. शतप्रतीशत भाजप, असा नारा मागील लोकसभा निवडणुकीत होता. आगामी निवडणुकीतही जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे, असा निश्चय भाजपने केला आहे. (Maximum number of MPs should be elected in upcoming elections as well)
संघटन बांधणीसाठी भाजपने लोकसभा व विधानसभानिहाय निवडणूक प्रमुखांची यादी काल (ता. आठ) जाहीर केली आहे. शिंदे गटाकडे असलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात भाजपने तयारी सुरू केली असून भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी दिली आहे.
२०२४च्या सुरुवातीला लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. या दोन्ही निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी आता पासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
सध्या भाजपला शिंदे गटाचा टेकू आहे. आगामी निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी लोकसभेच्या सर्व ४८ आणि विधानसभेच्या सर्व मतदारसंघांचा आढावा भाजपने घेणे सुरू केले आहे. त्यासाठी विधानसभा तसेच लोकसभा निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघावर भाजपचा डोळा आहे. सध्या हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहे. खासदार भावना गवळी या मतदार संघाचे नेतृत्व करतात. असे असतानाही भाजपने या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांना या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.
यवतमाळ विधानसभा मतदार संघाची जबाबदारी बाळासाहेब शिंदे, वणी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी संजय पिंपळशेंडे, राळेगाव विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सतीश मानलवार, दिग्रस विधानसभा महादेव सुपारे, आर्णी नरेंद्र नारलावार, पुसद आमदार निलय नाईक तर उमरखेड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांना देण्यात आली आहे.
वर्षभरावर लोकसभा निवडणूक आली आहे. तर, त्यानंतर विधानसभेचीही निवडणूक काही दिवसांनी येत आहे. या दोन्ही निवडणुकांच्या (Elections) तयारीच्या दृष्टीने भाजपने (BJP) एक पाऊल टाकले आहे. निवडणुकीच्या तयारीत भाजप नेहमीच पुढे असतो. आम्ही निवडणूक आल्यावर तयारी करत नाही, तर नेहमी तयारच असतो, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) नेहमीच सांगत असतात. कृतीतूनही भाजपने हे दाखवून दिले आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.