Mahavikas Aghadi's Meeting in Nagpur : कॉँग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे मनोमीलन व्हावे, या दृष्टीने या वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले होते. दर्शन कॉलनीच्या मैदानात जेवढी गर्दी होती, तेवढीच मैदानाबाहेर होती. त्यामुळे वज्रमूठ सभा यशस्वी झाली. परंतु, महाविकास आघाडीतील पक्षांतर्गत मतभेद दूर होऊन हा टेम्पो मतांत परिवर्तित होणे महत्त्वाचे आहे. पण सध्यातरी असे दिसत नाही. (This tempo is important to convert into Votes)
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेने भाजपविरोधातील रोषाला वाट मोकळी करून दिली. वज्रमूठ सभेचा काँग्रेसला किती फायदा होईल किंवा भाजपला नुकसान किती होईल, याबाबत आता चर्चा रंगली आहे. काही कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीत आघाडी राहील की नाही, याबाबत काहीच स्पष्ट नसल्याने तूर्तास बोलण्याचे टाळले तर काहींनी मनपा निवडणुकीत स्थानिक मुद्देच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडीची बहुप्रतिक्षित वज्रमूठ सभा नागपुरात झाल्यानंतर सभेतील गर्दीने कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात उत्साह नक्कीच संचारला. त्यातच सभा झालेल्या परिसरातील भाजप आमदारासह काही माजी नगरसेवकांत धडकी भरल्याचेही चित्र दिसते आहे. पुढील वर्षी विधानसभा व लोकसभेची निवडणूक आहे. त्यापूर्वी महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. ही चिंता भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांची डोकेदुखी वाढवणारी आहे.
भाजप नेते व संघावर तोंडसुख..
वज्रमूठ सभेतून केवळ भाजप व शिंदेना लक्ष्य करण्यात आले. नागपुरात शिंदेंचा प्रभाव नाही. सभेतून स्थानिक मुद्द्यांना बगल देण्यात आली. जयंत पाटील, नाना पटोले यांनी केवळ औपचारिकता म्हणून एक दोन स्थानिक मुद्द्यांना हात घातला. परंतु विदर्भातून आलेल्यांना या मुद्द्यांशी देणेघेणे नाही. भाजप नेते, संघावर तोंडसुख एवढीच या सभेची मर्यादा होती, अशी चर्चा शहरात रंगली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना मनपा निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांनाच महत्व असल्याचे वाटते आहे.
विरोधकांना शिव्या देऊन निवडणूक जिंकता येत नाही..
शहरात आम्ही नागपूरकरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. अनेक सुविधा अद्ययावत केल्या. कॉँग्रेसच्या फोकनाड घोषणांना यापूर्वीही नागपूरकरांनी लाथ मारली. आम्ही सतत काम करीत आहोत. त्यामुळे विरोधकांना शिव्या देऊन महापालिका निवडणूक जिंकता येत नाही. या सभेचा काहीही परिणाम मनपा निवडणुकीवर होणार नाही. आमचे कार्यकर्ते पाचही वर्षे काम करीत असतात. त्यामुळे यंदा मनपा निवडणुकीत १२० जागा आम्ही जिंकू, असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके (Pravin Datke) यांनी व्यक्त केला.
भाजप विरोधातील चीड बाहेर आली..
वज्रमूठ सभेतून भाजप (BJP) सरकारविरोधातील चीड बाहेर आली. मनपा (Municipal Corporation) निवडणूक स्थानिक मुद्द्यांवरच होईल. १५ वर्षे भाजप सत्तेत होती. आता एक वर्ष प्रशासक काम करीत आहे. नागपूरकर (Nagpur) भोंगळ कारभाराने त्रस्त आहेत. त्यामुळे शहर काँग्रेसने प्रभागनिहाय जनतेच्या समस्या निवारणासाठी केंद्र सुरू केले आहेत. कार्यकर्ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करीत आहेत, असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.