Uddhav Thackeray News : तुझा शर्ट माझ्यापेक्षा भगवा कसा? म्हणून फडणवीस गेले त्यांच्या मागे मागे !

Sanjay Raut : अयोध्येला मीसुद्धा गेला होतो, तेव्हा संजय राऊतही सोबत होते.
Eknath Shinde, Devendra Fadanvis and Uddhav Thackeray
Eknath Shinde, Devendra Fadanvis and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi's Meeting News : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केल्यानंतर ते सातत्याने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्यां हिंदुत्वाचा पुरस्कार करीत आहेत. अयोध्येलाही जाऊन आले. त्यांच्या मागे मागे मग आपले उपमुख्यमंत्री हेसुदधा जाऊन आले. शिंदेंच्या हिंदुत्वासमोर आपले हिंदुत्व कमजोर पडू नये, म्हणून फडणवीस शिंदेंच्या मागे मागे अयोध्येला गेले, अशी टिका उद्धव ठाकरे यांनी केली. (Sunil Kedar was also with me)

काल नागपुरात वज्रमूठ सभेत बोलताना ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्व आणि भगवा-भगवा करत फिरत असतात. शिंदेंच्या भगव्यासमोर आपला भगवा फिका पडू नये. तुझा शर्ट माझ्यापेक्षा जास्त भगवा कसा, ही तुलना होऊ नये, म्हणून फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या मागोमाग अयोध्येला गेले. अयोध्येला मीसुद्धा गेला होतो, तेव्हा संजय राऊतही सोबत होते. मुख्यमंत्री असताना गेलो तेव्हा सुनील केदारही माझ्यासोबत होते. पहिल्या प्रथम गेलो तेव्हा राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात होता.

पहिले मंदीर फिर सरकार,असं मी तेव्हा मी बोलले होतो. मी म्हणाले, मंदीर करा पण मोदी तेव्हा नाही म्हणाले. नाही. आता हे टिकोजीराव असं दाखवतात की, आम्हीच सर्वकाही करतोय. आता लाखो करोडो लोक जातील अयोध्येला, पण हे दाखवायला प्रत्येकवेळी टीव्हीवाले जाणार नाहीत तेथे. हे जर खरे रामभक्त असते, तर सुरत व गुवाहाटीला गेले नसते, अयोध्येला गेले असते. फडणवीसांचं म्हणजे नाड्याबरोबर गाड्याची यात्रा झाली, असे ठाकरे म्हणाले.

फडणवीस कधीतरी मुख्यमंत्री असताना अयोध्येला गेल्याचे आठवले का? तुझा शर्ट माझ्यापेक्षा जास्त भगवा कसा, म्हणून फडणवीस अयोध्येला गेले. अवकाली आणि गारपीटीचा मार बसल्यावर शेतकरी रात्रभर झोपले नाही, पण हे लोक देवदर्शनाला गेले होते. म्हणे रामराज्य आणणार… राम प्रजेची काळजी घेत होता, अन् हे प्रजेला वाऱ्यावर सोडून जातात. ते रामराज्य कधी येणार महाराष्ट्रात, असा सवाल ठाकरेंनी केला.

Eknath Shinde, Devendra Fadanvis and Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : बाबरी पाडायला शिवसेना नव्हती तर तुमचे काका गेले होते का?; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

वनवन भटकण्याची गरज नाही..

आम्ही कमीत कमी वेळत मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली होती की नव्हती, या त्यांच्या प्रश्‍नाला जनेतून होय असे उत्तर आले. आता शेतकरी म्हणतात आमच्या मयतीलाच या. हे बेशरम आहेत, जातीलही कदाचित. घरात बसून कारभार करणारा मुख्यमंत्री म्हणून मला हिणवले. पण तेव्हा पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर लागला होता. नुसतंच वनवन फिरलं म्हणून कामे होत नाही. तर कामे कुठूनही होतात. नागपुरात आम्ही टाटा एअरबस प्रकल्प आणत होतो. पण त्यांना वरून आदेश आला अन् तो प्रकल्प गुजरातमध्ये गेला, आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

राज्य सरकारचे आठ महिने आणि मोदी सरकारचे मोदींचे आठ वर्ष त्यांनी काय केले, हे समोर येऊन सांगत का नाही. यांचे ना दैवत हे, ना यांचा आदर्श. बाप चोरणारी औलाद आहे, जनतेला मुलासारखे हे काय सांभाळणार, असा सवाल करीत त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टिका केली.

Eknath Shinde, Devendra Fadanvis and Uddhav Thackeray
Nitin Raut News : नितीन राऊतांची गैरहजेरी खटकली, दोन दिवसांपूर्वी केली होती भाजप नेत्यांची स्तुती !

तेव्हा आम्ही आघाडीसोबत नव्हतो, पण..

२०१४च्या पूर्वी आमची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नव्हती. आम्ही कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत (NCP) लढत होतो. तेव्हा नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर सभा घेतली होती. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी तेव्हा आम्ही केली होती. त्यानंतर नागपुरात झालेल्या पहिल्याच अधिवेशनात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने आमची मागणी पूर्ण केली होती. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं होतं, असे चालवायचे असते सरकार, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजप-शिंदे सरकारवर निशाणा साधला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com