Vijay Wadettiwar Defamation Case : 100 कोटींचा दावा! भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा जोरदार 'भिडंत'

BJP leader Raju Patil Rajé files 100 crore defamation suit against Congress leader Vijay Wadettiwar and seven others over serious extortion allegations in Nagpur : काँग्रेसचे नेते विजय वेडट्टीवार यांच्यासह सात जणांविरोधात वाशिम मधील भाजपचे राजू पाटील राजे यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
Vijay Wadettiwar Defamation Case
Vijay Wadettiwar Defamation CaseSarkarnama
Published on
Updated on

BJP vs Congress Maharashtra news : राज्यात काँग्रेस अन् भाजपचा सत्तासंघर्ष टोकाचा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू आहे. यात देखील हा संघर्ष उफाळून आलं आहे. हा संघर्ष कधी-कधी वैयक्तिक पातळीवर देखील पोहोचतो. यातून न्यायालयीन लढाई सुरू होतात. अशीच लढाई विदर्भातील काँग्रेस अन् भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू झाली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह सात जणांविरोधात भाजपचे (BJP) वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांनी 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. राजू पाटील राजे यांच्यावर खंडणीचा आरोप केले होते. त्यातून हा दावा दाखल करण्यात आला आहे.

विजय वाडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासह हरीश गोवर्धनदास सारडा, तेजराव किसनराव इनामदार, पंकज अनिल इंगोले, आनंद अरुण खेर्डे, एक खासगी वृत्तवाहिनी, अशांविरोधात हा मानहानी दावा दाखल केला आहे. राजू पाटील राजे यांनी या दाव्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली.

राजू पाटील राजे म्हणाले, "28 डिसेंबर 2025 रोजी विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक माध्यमांसमोर माझ्याविरोधात गंभीर आरोप केले होते. वाशिममध्ये नकली नोटा प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल असूनही अटक झाली नाही. तसेच सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे, असे निराधार आरोप केले."

Vijay Wadettiwar Defamation Case
Fake Baba Ashok Kharat Nashik Case : महिलांच्या शोषणात भोंदूगिरीचा ‘खरात पॅटर्न’? रंजना गवांदेंनी मांडली धक्कादायक आकडेवारी...

वडेट्टीवार यांच्या या आरोपांवर आपण 3 जानेवारीला कायदेशीर नोटीस बजावून 15 दिवसांत खुलासा आणि माफी मागण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ना खुलासा केला ना माफी मागितली, असेही पाटील यांनी सांगितले. यानंतर वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात 18 मार्चला 100 कोटींचा मानहानी दावा दाखल केला. न्यायालयाने हा दावा स्वीकारला असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

Vijay Wadettiwar Defamation Case
Ashok Kharat : शपथविधी की बुवांचा जमाव? शहा, फडणवीस, शिंदे अडचणीत? शेतकरी नेत्याने अशोक खरात प्रकरणावरून टाकला राजकीय बॉम्ब!

माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांविषयी पुरावे न्यायालयात द्यावेत. अन्यथा जनतेची माफी मागावी. आपल्यावरील खोट्या आरोपांना कायदेशीर मार्गानेच उत्तर देणार असल्याचा निर्धार राजू पाटील राजे यांनी स्पष्ट केला. या मानहानीच्या दाव्यामुळे विदर्भात भाजप–काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष अधिक उफाळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com