अकोल्यात भाजपला धक्का; शिवसेनेची मुसंडी, अपक्षांचे वर्चस्व!

Grampanchayat Election : अकोटमध्ये भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा होत आहे.
Akola Grampanchayat
Akola GrampanchayatSarkarnama
Published on
Updated on

अकोला : आज राज्यातल्या ग्रामपंचायती निकाल लागले आहेत. अकोला (Akola) जिल्ह्यातल्या एकूण आठ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी होऊन निकाल हाती आले. अकोला ग्रामपंचायती निवडणूकीत शिवसेनेने (Shiv Sena) बाजी मारली आहे. शिवसेनेने दोन ग्रामपंचायती ताब्यात घेत अनेकांना धक्का दिला. बाळापूर तालुक्यातल्या व्याळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेने विजय मिळवला आहे.

व्याळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या गजानन वजीरे यांनी दणदणीत विजय खेचून आणला. एकूण 1529 मते वजीरे यांनी घेतली. तब्बल 600 मते अधिकची घेत आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा त्यांनी दारून पराभव केला आहे. शिवसेनेतल्या फूटीनंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनली होती.

दरम्यान, अकोट तालुक्यामधील आदिवासी बहुल भाग असणाऱ्या सात ग्रामपंचायती निकालात संमिश्र चित्र दिसून येत आहे. अकोट तालुक्यात तीन ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाड्या आणि अपक्षांनी बाजी मारत प्रस्थापित पक्षांना दूर सारले आहे. तर इतर ग्रामपंचायतीवर प्रत्येकी एक असे प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने विजय मिळवला आहे. तर अकोटमधील अमोना या ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक पार पडली.

शिवसेनेतल्या फूटीनंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. व्याळा जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या वर्षा वजीरे निवडून आल्या आहेत. आता सरपंचपदावरही वजीरे कुटुंबातीलच गजानन वजीरे निवडून आले. 13 सदस्यीय व्याळा ग्रामपंचायतीवर शिवसंग्रामचे पुरुषोत्तम मांगटे पाटील यांचे तब्बल पाच सदस्य निवडून आले. यामुळे आता इथे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.

Akola Grampanchayat
अमरावतीत काँग्रेसचा डंका; शिवसेना, राष्ट्रवादी, शिंदे गटाचा धुव्वा

गुल्लरघाटच्या ग्रामपंचायत सरपंचपदी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटना पुरस्कृत पॅनलचे प्रकाश डाखोरे यांनी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे पोपटखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंचित बहुजन आघाडीचे विजेंद्र तायडे यांनी विजय संपादित केला आहे. तायडे यांनी ग्रामपंचायतीवर आता एकहाती सत्ता खेचून आणली आहे. शिवपूर-कासोद या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार माया मनिष महल्ले विजयी झाल्या आहेत. धारगड ग्रामपंचायत सरपंचपदी अपक्ष संजय ठाकरे तर धारुर-रामापूर ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजू धुंदे हे विजयी झाले. अमोना ग्रामपंचायत सरपंचपदी मदन बाबूलाल बेलसरे हे अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात विशेष बाब म्हणजे अकोटमध्ये भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा होत आहे.

अकोला जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीचे निकाल

अकोट तालुका :

1) गुल्लरघाट : सरपंचपदी बच्चू कडूं यांच्या प्रहार समर्थीत पॅनलचे प्रकाश डाखोरे विजयी.

2) पोपटखेड : सरपंचपदाच्या निवडणुकीत वंचितचे विजेंद्र तायडे विजयी. पांडुरग तायडे संपूर्ण बहूमतासह विजयी.

3) शिवपूर-कासोद : सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष माया मनिष महल्ले विजयी.

4) धारगड : ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत अपक्ष संजय मानिक ठाकरे विजयी.

5) धारुर-रामापूर : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजू धुंदे विजयी.

6) अमोना : मदन बाबूलाल बेलसरे हे अपक्ष उमेदवार सरपंचपदी बिनविरोध निवडून आले.

7) सोमठाणा : सरपंचपद अर्जच न आल्याने रिक्त आहे.

बाळापूर तालुका

8) व्याळा : सरपंचपदी शिवसेनेचे गजानन वजीरे 1529 मते घेत सरपंचपदी विजयी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com