Chandrashekhar Bawankule : बावनकुळे संतापले, रोष कोणावर?

Chandrashekhar Bawankule : एकेकाळी भंडारा जिल्ह्यात भाजपचा खासदार निवडून येत होता. आमदारांची फौज सोबत होती. संघाचे नेटवर्क होते. मात्र, मागील काही वर्षांपासून पक्षाचा आलेख घसरत चालला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुनील मेंढे पराभूत झाले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News, 04 August : लोकसभेत पराभव झाल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी गेलेले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) नगण्य उपस्थिती बघून चांगलेच संतापले.

सात दिवसाच्या आत परत किमान दीड हजार कार्यकर्त्यांची बैठक बोलवा, असे निर्देश त्यांनी स्थानिक आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी आणि आढावा घेण्यासाठी शनिवारी भंडारा जिल्ह्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे एक दिवसाचे संमेलन आयोजित करण्यात आले होते.

मात्र, कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून बावनकुळेंचा (Chandrashekhar Bawankule) पारा चढला. त्यांनी थेट सर्वांना अल्टिमेटम दिला, आता सात दिवसाच्या आत गर्दी जमवण्याचे त्यांनी आदेश दिल्यामुळे आता स्थानिक नेत्यांना चांगलीच धावपळ करावी लागणार आहे.

एकेकाळी भंडारा (Bhandara) जिल्ह्यात भाजपचा खासदार निवडून येत होता. आमदारांची फौज सोबत होती. संघाचे नेटवर्क होते. मात्र, मागील काही वर्षांपासून पक्षाचा आलेख घसरत चालला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुनील मेंढे पराभूत झाले.

Chandrashekhar Bawankule
Video Prakash Ambedkar : कुणबी मराठ्यांना मतदान करु नका, त्यांची पाटीलकी जागी झाली तर...; आबेडकरांचं खळबळजनक विधान

एक एक नेते पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे भाजपला आता विधानसभेची चिंता सतावत आहे. नाना पटोले रोज आव्हान देत आहेत. अशा परिस्थितीत पक्षाच्या अधिवेशनाला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने बावनकुळे संतापल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचा सर्व रोष एका युवा नेत्यावर असल्याचंही बोलले जात आहे.

Chandrashekhar Bawankule
Anil Deshmukh: अनिल देशमुखांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज; हिंमत असेल तर चांदिवाल अहवाल सार्वजनिक करा...

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मेंढे-फुकेंच्या गटातटाच्या राजकारणामुळे भाजपवर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. गटबाजीमुळे पक्षातील एका गटाचे कार्यकर्ते अधिवशनाला उपस्थित नव्हते अशी माहिती आहे. अशातच आता निष्ठावान आणि उपरे असा नवा वाद येथे उफाळून आला आहे. ही भाजपसाठी धोक्याची घंटी ठरू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com