Amravati Graduate Election Result : भाजपला तिसरा पराभवाचा धक्का; अमरावतीत धीरज लिंगाडेंच्या गळ्यात विजयाची माळ

Dheeral Lingade Vs Ranjit Patil : मागील २८ तासांपासून याठिकाणी मतमोजणी सुरू होती.
Dheeral Lingade Vs Ranjit Patil
Dheeral Lingade Vs Ranjit PatilSarkarnama
Published on
Updated on

Amravati News: अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत धीरज लिंगाडे आणि भाजप उमेदवार ऱणजित पाटील यांच्यात थेट लढत झाली. मागील २८ तासांपासून याठिकाणी मतमोजणी सुरू होती. अखेर या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यात भाजपच्या रणजित पाटलांचा पराभव झाला असून महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांचा विजय झाला आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत धीरज लिंगाडे आणि भाजप उमेदवार ऱणजित पाटील यांच्यात थेट लढत झाली.

Dheeral Lingade Vs Ranjit Patil
Kasaba By-Election: कसबा पोटनिवडणुकी साठी भाजपचा उमेदवार जाहीर? चंद्रकांत पाटील म्हणाले...

अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांना निर्णायक आघाडी मिळाली आहे. धिरज लिंगाडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. थोड्याच वेळात त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणार आहे. अत्यंत चुरशीच्या  झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे.

धीरज लिंगाडे यांना एकूण 46344 मतं पडली, तर भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना 42962 मत मिळाली. धीरज लिंगाडे यांचा 3382 मतांनी विजय झाला आहे.

Dheeral Lingade Vs Ranjit Patil
Shivjayanti In Agra: आग्र्यात शिवजयंतीला परवानगी नाकारल्यामुळे वाद पेटला; संतप्त शिवसैनिकांचं औरंगाबादला आंदोलन

अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत धीरज लिंगाडे आणि भाजप उमेदवार ऱणजित पाटील यांच्यात थेट लढत झाली. यावेळी एकूण २३ उमेदवार रिंगणात उभे होते. अमरावती मतदारसंघात ३० जानेवारी रोजी एकूण ४९.७५ टक्‍के मतदान झाले होते. मतमोजणी केंद्रावर गुरूवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या मतमोजणीची गती संथ होती.

पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीअखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) यांना ४३ हजार ३४० तर भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २७ मते प्राप्‍त झाली होती. लिंगाडे यांची आघाडी ही त्‍यावेळी २ हजार ३१३ मतांची होती. वैध मतांची संख्‍या ही ९३ हजार ८५२ इतकी असल्‍याने विजयासाठी आवश्‍यक मतांचा कोटा हा ४६ हजार ९२७ मते इतका निश्चित करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com